
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने श्रीलंका क्रिकेटचे सदस्यत्व निलंबित केलं आहे.काल झालेल्या आयसीसीच्या बैठकीत श्रीलंका क्रिकेटने सदस्य म्हणून आपल्या कर्तव्यांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. श्रीलंका क्रिकेट बोर्ड स्वायत्तपणे काम करू शकत नाही आणि क्रिकेटचे व्यवस्थापन, नियमन आणि प्रशासनात सरकारचा हस्तक्षेप करून नियमांचे उल्लंघन केलं असल्याचं परिषदेने म्हटलं आहे.
दरम्यान निलंबनाच्या अटींबाबत परिषद योग्य वेळी निर्णय घेईल, असं या संदर्भातील अहवालात म्हटलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत