त्रिसरण व पंचशील याचा मूळ अर्थ व मानसशास्त्रीय अपेक्षा व व्यक्तीचे रूपांतरण

12 मे 2025 बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने…
त्रिसरण पंचशील याचा मूळ अर्थ समजला नसेल तर यांत्रिक पद्धतीने याचे रोजच्या जीवनात उपयोग करणे म्हणजे अज्ञान पणाचे ठरेल!!!
राजीव शिंदे( बुद्धिस्ट आर्किऑलॉजिस्ट,सोलापूर-पुणे.)
सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या गाथा सोबत मानवाचे मानसशास्त्र जोडलेले आहे त्यामुळे मानवी मनाचे पूर्णपणे रूपांतर करण्याची क्षमता यात आहे
मानवाच्या मनावर सखोलपणे तर्कशास्त्र युक्त व अनुभूती प्रत सर्वात जास्त जगाच्या पाठीवर अभ्यास केला असेल तर तो तथागत गौतम बुद्धांनी!
गौतम बुद्धांनी प्रत्येक गाथा त्याचे उच्चारण्याची पद्धत व त्याचे पुनरुच्चारण या पाठीमागे मानवी मनाच्या गुणांचा व क्षमतेचा अभ्यास करूनच हे सर्व सांगितले आहे.
खालील बुद्धांचे वाक्य हे आपणास त्या संदर्भातील पुरावा म्हणूनच सांगता येऊ शकतो.
tsso imā bhikkhave vandanā katamā tsso kāyena vācāya, manasā imākho bhikkhave tsso vandanā
“बुद्धाच्या शब्दांचा अर्थ असा आहे: वंदना करणारी व्यक्ती तीन संभाव्य मार्गांनी करू शकते. तीन मार्ग आहेत: ( हे म्हणत असताना शरीराप्रति जागृत राहून; वाचेप्रती जागृत राहून; व मना प्रती जागृत राहून) त्याच्या शब्दांसह; त्याच्या मनसासोबत (उद्देश, इच्छा किंवा एखादी कृती पूर्ण करण्याची मानसिक क्षमता.(AN) सिद्धार्थ बुद्धांच्या या मार्गदर्शनातून असे कळते की आपण तीन वेळा नमन का करायचे!( अंगअनुत्तर निकाय)
1) शरीरा प्रति सजग राहून
2) वाचे प्रति सजग राहून
3) मनाप्रती सजग राहून
================
||नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्ब्बुध्दस्स ||
||नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्ब्बुध्दस्स ||
||नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्ब्बुध्दस्स ||
@ त्रिसरण पंचशील सुरुवात करण्याआधी म्हणण्यात येणाऱ्या व सिद्धार्थ गौतम यांच्या विषयी आदरपूर्वक व कृतज्ञ पूर्वक नमन करण्यासाठी संबोधित करण्यात आलेले खालील शब्द व त्याचा मूळ अर्थ:
नमो: म्हणजे मन विरहित किंवा मन नसलेल्या अवस्थेत
तस्स: त्यांना( अशा सर्व बुद्धांना)
भगवतो: की जो मनाच्या द्वंद्व(duality) अवस्थेच्या पलीकडे गेलेला आहे.(“bhag” means negative polarity and Vat means positive polarity =Duality)
अरहतो: ज्याचे सहा इंद्रियाद्वारे निर्माण होणाऱ्या क्लेश, आसवं व समायोजना(cycle of nature) आपोआप गळून पडले आहेत असा तो पूज्य.(Even killing of klesha,Asava is not expected in dhhamma)
सम्मासम्ब्बुध्दस्स: जो संपूर्णतः त्या सम (Non dual) अवस्थेत पोचलेला आहे (Samma Sam = संपूर्णतः) ; जो अस्तित्वाच्या खोलातल्या खोल अशा बिंदूवर पोहोचला आहे असा तो आदरणीय बुद्ध.( बुद्ध अवस्थेला प्राप्त झालेला)
या तीन(Repeatation) आपण संपूर्ण जागृत अवस्थेत राहून हे नमन करत असतो. त्यामुळे बुद्ध, धम्म व संघ यांच्या प्रति सजग राहून व त्यांची मदत (घेऊन आपण बुद्धाच्या मार्गावर चालण्याचा सजग पणे प्रयत्न करत आहोत याची जाणीव खोल मनावर रुजते.(Total Awarness+Repeatation= Stream enterer; धम्म प्रवाहात उतरणारा) आणि ही म्हणणारे व्यक्ती धम्म प्रवाहामध्ये उतरण्यास मदत होते.
वरील अशाप्रमाणे अपेक्षित असलेल्या अवस्थेत पण खरंच भगवान बुद्धांना नमन करतोय का हा एक प्रश्नच आहे? का वंदना ही पटपट उच्चारून संपवायची किंवा जागृत अवस्थेत न करता एखाद्या मशीन प्रमाणे आपण ते सर्वांबरोबर पुटपुटत असतो…. असे आहे का?
भगवान बुद्धांचा मार्ग हा प्रायोगिक म्हणजेच प्रॅक्टिकल आहे तो शब्दांचा खेळ नाहीये….
वंदना करत असताना जर आपल्या सजग व तीव्र भावना या बौद्ध गाथा म्हणताना जोडलेल्या नसतील तर त्याचा काहीही उपयोग नाही.
त्रिसरण व आपली( मानवी) मनोवस्था व त्यातील महत्त्वाच्या शब्दांचा मूळ अर्थ
गौतम बुद्धांच्या गाथा म्हणण्यासाठी काही आवश्यक बाबींची (prerequisite) पहिल्यांदा पूर्तता करणे आवश्यक आहे. त्यानंतरच या गाथा त्या व्यक्तीसाठी फुलदृप होऊ शकतात. तर काय आहेत हे आवश्यक घटक आपण पुढे पाहूया.
1) जागृत अवस्था: बौद्ध धम्मा मध्ये पदोपदी या शब्दाचा वापर झालेला दिसतो पण नेमकी ही व्यवस्था आपल्या मनाची काय असते हे तितकेसे आपल्याला सविस्तरपणे सांगितले गेले नसल्यामुळे आपल्याला याबाबतीत काही कळत नाही.
पण एका उदाहरणाद्वारे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
उदाहरणार्थ: एखाद्या अनोळख्या व्यक्तीने अचानकपणे आपल्या छातीवर मारण्यासाठी सुरा ठेवला आहे. त्यावेळेस आपल्या मनाची अवस्था काय असते हे आपण कल्पना करून जाणून घेऊ शकतो.
दुसरा एका उदाहरणाद्वारे असे समजावून सांगता येईल की जेव्हा आपण लहान होतो त्यावेळेस एखादे कुत्रे आपल्या पाठीमागे लागले असताना आपण जीव मुठीत धरून जेव्हा पळायला लागतो त्यावेळेस जशी अवस्था असते तशी.
यावरील दोन्ही प्रसंगांमध्ये आपले मन हे संपूर्ण पणे एकत्र येऊन विचार शून्य होऊन केवळ आपला जीव वाचवण्यासाठी प्रदीप्त होते ती अवस्था म्हणजे जागृत अवस्था.
आता अशा प्रकारची अवस्था रोज व सतत असणे हे आपल्याला कठीण वाटते. पण हेच साधण्यासाठी आपल्याला ध्यान मार्गावर किंवा विविध ध्यानाच्या मार्फत शिकवले जाते. जर अशा प्रकारची प्रक्रिया होत नसेल तर आपण कदाचित ध्यान करीत नाही असे म्हणायला काही हरकत नाही.
2) जागृत अवस्थेची दिशा: यावरील जागृत अवस्थेला दिशा योग्य मार्गावर नेण्यासाठी बुद्ध धम्मातील महत्त्वाचे तीन रत्न म्हणजेच बुद्ध ,धम्म व संघ यांना आपण त्यांची सहाय्यता मिळण्यासाठी आवाहन करतो.( बौद्ध धम्मा मध्ये याचना या शब्दाला व भावार्थाला स्थान नाही)
बुद्ध धम्माचा गाभार्था अत्त दीप भव हाच आहे. बुद्धांचे महापरिनिर्वाण होत असताना एका भिक्षू ने त्यांना हा प्रश्न विचारला होता.
तर खालील प्रमाणे बुद्ध वंदना आहे गेली पाहिजे.
🌷 जागृत(Total Awarness) अवस्थेत शब्द न शब्द हा वंदना करताना संपूर्ण अंतर्मनात बिंबला गेला पाहिजे असे अपेक्षित आहे.
1) बुद्ध शरणं गच्छामि|
बुद्ध अवस्थेला प्राप्त झालेल्या सर्व महान व्यक्तींचे सहायता(शरणं= to take support or detrmined to) घेऊन मी बुद्धाच्या मार्गावर जाण्याचा संकल्प करतो. ( बुद्धही व्यक्ती नसल्याने येथे शरण जाणे हे अपेक्षित नाही. पाली शब्द सरणं याचा *शब्द व्युत्पत्तीशास्त्रा प्रमाणे सरणं या *शब्दाचा अर्थ सहायता घेणे* होतो शरण जाणे नव्हे. नंतरच्या कालावधीमध्ये जेव्हा पाली भाषेवर संस्कृत भाषेचा अधिक प्रभाव पडला त्यानंतर या शब्दाचा भावार्थ बदलून शरण जाणे हा झाला.
2) धम्मं शरणं गच्छामि|
विविध बुद्धांच्या शिकवणीचे सहाय्य घेऊन मी धम्ममार्गावर चालण्याचा संकल्प करतो.
3) संघं शरणं गच्छामि|
मी बुद्ध अवस्थेला प्राप्त झालेल्या सर्व व्यक्तींच्या संघाचा( जीवन धारण केलेला बौद्ध भिक्षू किंवा सामान्य व्यक्ती ज्यांनी बुद्धत्व ही अवस्था प्राप्त केली आहे) सर्वांचे सहाय्य घेऊन त्यांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करतो.
टीप: येथे बौद्ध भिक्षु यांचा संघ हे अपेक्षित नाही
अशाप्रकारे आपली किंवा प्रत्येक व्यक्तीची मनोवस्था अशाप्रकारे तयार करून जर आपण वंदना म्हणत असू तरच त्याला काही अर्थ उरणार आहे.
पालेभाषेवर संस्कृत भाषेचा प्रभाव नंतरच्या काळात वाढल्यामुळे *पाली भाषेतील शब्दांचा मूल अर्थ किंवा गाभार्थ व त्याचे भाषांतर करण्यास अनेक इंग्रज लेखकांना अवघड गेले. आणि त्यानंतरच्या भारतीय लेखकांनी तशाच प्रकारे त्याची भाषांतर करून अर्थ लावल्याने येथे फरक पडलेला दिसतो की ज्यामुळे संपूर्ण बौद्धतत्त्वज्ञानाला हे शब्द आवाहन देऊ शकतात.
पंचसिखपद(Pali) संस्कृत संस्कारित भाषेत याला पंचशील असे संबोधले जाते
हे नियम पाळण्यास खरंच अवघड आहेत का?
बौद्ध धम्मा मध्ये सामान्य लोकांसाठी नैतिकता निर्माण करण्यासाठी पंचसिखपद बौद्ध सिद्धांतामध्ये अंतर्भूत करण्यात आले की ज्यामुळे ज्ञानाच्या मार्गावर प्रगती करण्यासाठी मन आणि चारित्र्य विकसित करण्यासाठी सहाय्यक ठरते. त्यांना कधीकधी श्रावकयान उपदेश म्हणून संबोधले जाते.
6 व्या शतकातील ईसापूर्व भारताच्या धार्मिक शिक्षणा मध्ये हे पाच उपदेश समाविष्ट नव्हते, परंतु हे समाविष्ट करून तथागत गौतम बुद्धांनी मानवाच्या मानसिक आचार विचारांमध्ये क्रांती आणली.
सुरुवातीच्या बौद्ध ग्रंथांमध्ये दर्शविल्याप्रमाणे, उपदेश अधिक महत्त्वाचे बनले आणि शेवटी बौद्ध धर्माच्या सदस्यत्वाची अट बनली.
पण आधुनिक जगात बौद्ध धर्म स्वीकारलेल्या असंख्य जनतेसमोर अनेक प्रश्न त्यामुळे निर्माण झाले आहेत किंवा त्यांनी स्वतः निर्माण केल्या आहेत.
मासाआहार, लैंगिकता, भ्रष्टाचार आणि मादक द्रव्य यांचे सेवन या ना त्या प्रकारे केले जाते कधी नोकरीमधील ग्रुप, शिष्टाचार आधुनिक समाजव्यवस्था यावर खापर फोडले जाते. पण यातून मार्ग काय आहे?
तसेच समाजव्यवस्थेमध्ये नागवला गेलेला समाज मुख्यतः त्यांचे अन्न मांसाहारी होते त्यामुळे परंपरागत खाण्यासाठी उपलब्ध असलेल्या मांसाहारी अन्न याचा त्या कसा करावा हे त्यांच्या मानसिक ते समोर मोठे आवाहन आहे!!!
1) पहिला नियम (सिखपद):
पहिल्या नियमात मानव आणि सर्व प्राणी यांना मारण्यास मनाई आहे. विद्वानांनी फाशीची शिक्षा, आत्महत्या, गर्भपात आणि इच्छामरणाचा विरोध आणि निषेध म्हणून बौद्ध ग्रंथांचा अर्थ लावला आहे. बौद्ध धम्माचा प्रसार व प्रचार जगाच्या विविध भागांमध्ये झाल्यामुळे व त्यानंतर भौगोलिक विविध स्थानावर सुरुवातीच्या अस्तित्व असलेल्या तेथील प्रथा यांचा संगम होऊन काही ठिकाणी हिंसा मान्य केली गेली. त्यामुळे खालील प्रश्न उदयास आले.
a) बौद्ध भिक्षूने मास हे अन्नदानात स्वीकारले पाहिजे की नाही?
b) युद्ध केले पाहिजे की नको किंवा युद्ध लादल्यास युद्ध करावे की नको?
c) प्रतिकूल प्रदेशात मांसाहारी अन्न आहारात घ्यावे की न घ्यावे?
उत्तर: गौतम बुद्धांच्या उपदेशानुसार असे आढळून येते की केवळ अपवादात्मक (Rarest of rare situation) परिस्थितीमध्येच अशा कृतींना मान्यता दिलेली आहे असे दिसते. त्यामुळे तसे पाहायला गेले तर मांसाहारी अन्न बौद्ध धर्मामध्ये निशिद्ध आहे. आजच्या जगामध्ये विशेषतः शहरी भागामध्ये अन्नाची उपलब्धता असताना मांसाहारी अन्न स्वीकारणे म्हणजे जाणीवपूर्वक हिंसा करणे हे होय.
2) दुसरा नियम: म्हणजे आदिनादान विरत्ती. म्हणजे जे दिले नाही ते घेणे टाळणे. मालकाची परवानगी न घेता दुसऱ्याच्या वस्तू घेणे आणि दुसऱ्याची मालमत्ता बळजबरीने किंवा फसवणूक करून किंवा फसवणूक करून किंवा खोटे वजन, खोटी मापाची टोपली किंवा खोटे मोजमाप किंवा भेसळ करून खरेदी करणे हे आदिनादान काम होय.
3) तिसरा नियम
चोरी आणि संबंधित क्रियाकलाप जसे की फसवणूक प्रतिबंधित करतो.
a) प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे अनुचित मार्गाने घेतलेला पैसा त्यालाच आपण भ्रष्टाचार म्हणतो याचा देखील समावेश चोरी या प्रकारात होतो.
a) अपवादात्मक परिस्थितीत बौद्ध धम्मात चोरी मान्य आहे का?
उत्तर: पंचशील हे मनाची जागृत अवस्था वाढवण्यासाठी देण्यात आलेले नियम आहेत. त्यामुळे अपवादात्मक स्थितीमध्ये देखील चोरी मान्य नाही.
4) चौथा नियम :
लैंगिक गैरवर्तनाचा संदर्भ देते, आणि आधुनिक काळातील विद्वानांनी लैंगिक जबाबदारी आणि दीर्घकालीन वचनबद्धता याद्वारे गैरवर्तन या शब्दाचा अर्थ लावला आहे.
लैंगिक गैरवर्तन व जबाबदारी या शब्दांमध्ये खूप काही समाविष्ट होते याचा परिघ फार मोठा आहे. जागरूक अवस्था जसजशी वाढत जाते तसतसे यावर आपल्याला नियंत्रण मिळवता येते.
5) पाचवा नियम:
अल्कोहोल, ड्रग्स किंवा इतर माध्यमांद्वारे नशा करण्यास मनाई करतो.
यावरील अनैसर्गिक पदार्थांमधून किंवा काही नैसर्गिक पदार्थ वापरून तयार केलेले पेय जे मानवी मनास अजागृती कडे पोचवते त्यामुळे बौद्ध धर्मामध्ये याचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
जागरूकता हा बौद्ध धम्माचा गाभा आहे त्यामुळे मानवी दैनंदिन व्यवहार व आचार विचार यामध्ये जागरूकता वाढवण्यासाठी सामान्य श्रावक जन यांना हे वरील पाच नियम देण्यात आले आहे.
जो चरितशिलाकडे दुर्लक्ष करतो तो वरित्त शिलामध्ये परिपूर्ण नाही. शीलाच्या अपवित्रतेने, अज्ञानी मन एकाग्र करू शकत नाही. एकाग्र नसलेले मन सत्य पाहू शकत नाही. सत्य न पाहिल्याने दुःखातून मुक्ती होत नाही.
आजच्या आकडेवारीनुसार भारतातील 39 टक्के लोक शाकाहारी आहेत. त्यामुळे शाकाहारी होण्यासाठी कोणतीही अडचण नसावी असे दिसते. आजूबाजूला उपलब्ध असणारे अन्न हे शाकाहारी स्वरूपात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने त्याचा स्वीकार करणे हे आपल्या मानसिकतेवर अवलंबून आहे. यात काही अडचण असावी असे वाटत नाही. मांसाहारी अन्न हे स्वस्त मिळते ही सबब सांगणे आता तितकी खरे नाही, तरी काही अपवाद असू शकतात.
लैंगिक गैरवर्तन हे आपण नक्कीच टाळू शकतो. पण आज कालच्या बाह्य जगात लैंगिकतेचे प्रदर्शन इतके वाढले आहे की त्यामुळे मानवी मन साहजिकच प्रभावित होते. बुद्धाने सांगितलेल्या जागृतीच्या मार्गावर मार्गक्रमण करीत असताना याला देखील टाळता येऊ शकते.
सीनियर लोकांसोबत मादक द्रव्यांचे पार्टी आवश्यक असते काही आधुनिक लोकांसमोर प्रश्न आहेत, तसे न केल्यास आपण त्या ग्रुपच्या बाहेर पडतो व व त्यांच्यासोबतचे संबंध कमी होतात असे सांगितले जाते,त्यामुळे भ्रष्टाचाराद्वारे( चोर) येणारा मोठा पैसा मिळत नाही त्यामुळे समाजामध्ये स्टेटस राहत नाही अशी कारणे पुढे गेली जातात.
बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर वरील प्रमाणे अशी कोणतीही सबब किंवा कारण पुढे करता येणार नाही म्हणूनच बौद्ध धम्म हा हा केवळ सिद्धांतिक नसून हा प्रायोगिक धम्म आहे.
पंच सिख पद याचे पालन अवघड आहे पण नक्कीच अशक्य नाही
लेखक: राजीव शिंदे, (सोलापूर- पुणे)
(बौद्ध आर्किऑलॉजिस्ट व संशोधक)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत