नळदुर्ग जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी राणी धनराज वाघमारे यांची निवड

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
जिल्हा परिषद कन्या प्रशाला नळदुर्ग ता तुळजापूर या शाळेची शालेय व्यवस्थापन समिती निवड
करण्यात आली . जिल्हा परिषद कन्या प्रशाला मध्ये पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पालका मधून एकमताने व्यवस्थापन समिती सदस्य निवडण्यात आली ही समिती आजतागायत कधीच निवडणूक घेतलेली नव्हती परंतू लोकशाही पद्धतीने शांत पणे मतदान करून शालेय व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली यात अध्यक्ष पदाची माळ सामाजिक कार्यकर्त्या राणी धनराज वाघमारे यांच्या गळ्यात पडली . या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ३ पालक महिला उभ्या होत्या त्यामध्ये राणीला ९ मतदान मिळाले मिराला वाघमारे यांना ५ मते अंजनाला २ मते आसे मतदान झाले यामध्ये राणी धनराज वाघमारे ह्या विजयी झाल्या
उपाध्यक्षपदी संजय राठोड यांची बिनविरोध निवड आली तर तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शक म्हणून अॕड प्रा डाॕ पाहुरंग पोळे निवड करण्यात आली तर सदस्य म्हणून अंजना चव्हाण ,मिरा वाघमारे,ज्योती माने,जोत्सना बनसोडे , चंद्रकला राजगुरु, नवनाथ काळे ,गोविंद राठोड,अल्ताफ बेग , सुवर्णा बागडे ,कु प्राजक्ता होंडराव यांची निवड करण्यात आली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नळदुर्ग Live चे संपादक पत्रकार दादासाहेब बनसोडे हे होते तर आसुन प्रतिनिधी म्हणून मिलींद कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. प्रा डॉ पांडुरंग पोळे व पत्रकार दादासाहेब बनसोडे यांनी आलेल्या पालकाना मार्गदर्शन केले ही संपूर्ण प्रक्रिया शाळेचे मुख्याध्यापक तथा व्यवस्थापकीय सचिव कमलाकर गायकवाड यांनी खेळी मेळीच्या वातावरणात पार पाडली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले यासाठी केंद्रप्रमुख सत्तेश्वर जाधव, सर्व शिक्षक व काही पालक या मेळाव्याला उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत