महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीय

प्रेम आणि हिंसा भाग – १. अशोक सवाई

प्रेम, प्रेम विवाह किंवा आंतरजातीय विवाह, जुळवलेले विवाह, अपेक्षाभंग, प्रेमभंग, विश्वासघात, पालकांची कुचंबणा, यावर मध्यंतरी जागृती न्युज च्या माध्यमातून आपल्या काही व्हिडिओ क्लिप आल्या होत्या. त्यावर मी माझ्या परीने अभिप्राय व सूचना देत आलो आहे. त्यात मी हेही म्हटले होते की, हा विषय निरंतर चालणारा आहे यावर आपल्याला सातत्याने बोलावे लागणार. आपण एक कायद्याच्या अभ्यासिका आहात. तेव्हा कायद्याच्या व थोड्याशा कडक भाषेत आजच्या तरुणाईला समज देणे गरजेचे आहे. तुम्ही म्हणा आम्ही म्हणा आपण आपल्या परीने उपलब्ध माध्यमातून जागृतीचे काम करत असतो. त्यातून वेळेच्या आधी जेवढ्यांना सावरता येईल तेवढ्यांना सावरण्याचा प्रयत्न करू या. असो.

१) भारतीय स्त्री वर्गावर असलेला पुरुषप्रधान संस्कृतीचा जबरदस्त पगडा: हा पगडा दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढतच चालला. विशेष म्हणजे २०१४ पासून जरा जास्तच. मी पुरोगामी आहे म्हणणारे देखील आतून प्रतिगामी असतात. आणि पुरूषप्रधान संस्कृतीला मुक संमती देण्याचे काम करतात. (अपवाद वगळून) काही अभद्र घटना घडल्यावर हेच लोक मूकबधिर होतात. अशा लोकांच्या घराजवळ जेव्हा आग येवून ठेवते तेव्हा हेच चिल्लावतात. पुरुषप्रधान संस्कृतीला जन्म वैदिक धर्मग्रंथांनी दिला आणि तिचे मोठ्या लाडाने लालन पालन, किंवा पालन पोषण करून मोठे केले ते पुण्यातील सदाशिव पेठेने.

२) आजच्या तरुणाईत सृजनशीलतेचा व प्रेमाच्या परिभाषेचा अभाव: ५०,६०,७० च्या दशकात म्हणजे तुमच्या आमच्या पिढीपर्यंत जो विवेक होता, जी ससृजनशीलता होती ती आता राहिलेली नाही. (अपवाद वगळून) पूर्वी मायबाप अशिक्षित अडाणी असुनही मुलांमध्ये सृजनशीलता, सहनशीलता विवेक होता. त्याला कारण होते आजूबाजूंचे स्वच्छ सामाजिक व सांस्कृतिक वातावरण. आज तसे नाही. आताच्या विशेषतः मुलांमध्ये त्या गोष्टींचा अभाव दिसून येतो. त्यामुळे प्रेमाची परिभाषाच माहिती नसल्याने प्रेम कशाशी खातात हेच माहीत नसते. या अभावामुळे हटवाद, मी पुरुष असा अहंकार, मी म्हणतो तेच खरं अशा गोष्टी मुलांमध्ये पोसल्या जातात. त्यामुळे समोरच्या मुलीने प्रेम करण्यास किंवा प्रेम विवाहास नकार देताच प्रेमवीर जो आतापर्यंत स्वतःला फिल्मी नायक समजणारा शीघ्रकोपी होवून लगेच नायकाचा खलनायक होतो ‘अगर तू मेरी नही हो सकती तो मैं तुझे किसी की भी होने नही दुंगा हा फिल्मी खलनायकी डाॅयलाॅग त्याच्या डोक्यात फिट बसलेला असतो. आणि त्यातून मुलींची हत्या घडवून आणली जाते. असे मुलं स्वतःही जिंदगीतून उठतात. आणि मायबापाच्या भोवती भोग आणतात. जे मायबाप आपला बाबू शिकून मोठा माणूस बनेल या आशेवर ते जगत असतात. तरल प्रेम म्हणजे काय, प्रेमाची परिभाषा म्हणजे काय हे समजण्यासाठी या तरूण तरुणींनी ६०/७० च्या दशकातील जुने चित्रपट जरूर पहावे.

३) आजच्या जमान्यात गर्ल फ्रेंड/ बाॅय फ्रेंड असणे ही एक ॲडिशनल कल्चर किंवा संस्कृती: पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हटले जाते. शेतकऱ्यांची, शेतमजुरांची, कामगारांची व हातावर पोट असणाऱ्यांची मुलं मुली भविष्यातील आपले स्वप्न घेऊन गावखेड्यातू, निमशहरातून या पुण्यात शिक्षणासाठी येतात. काहींचे स्वप्ने पूर्ण होतात, काहींचे अर्धवट राहतात. ते अर्धवट स्वप्ने घेवूनच माघारी परततात. तर काहींच्या स्वप्नांचा चक्क घात होतो. खेड्यापाड्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना पुणे ही स्वप्ननगरी, मायानगरी, पुण्यनगरी वाटत असते. अशातच ते आपल्या स्वप्नांना जवळ करत राहतात. पण शिकत असताना एकतर्फी प्रेमातून एखाद्या मुलीची हत्या झाली की त्याचा परिणाम या मुलां/मुलींच्या शिक्षणावर, त्यांच्या पालकांवर कमीअधिक प्रमाणात होतो.

            काॅलेजात शिकत असताना खास करून मुलांना (निसर्ग नियमाच्या आकर्षणापोटी) वाटते की आपली एखादी गर्लफ्रेंड असावी. ज्याची नसेल त्याला त्याचे  मित्रमंडळी मागास समजतात. म्हणजे ज्याला गर्लफ्रेंड नाही म्हणून तो आधुनिक जगातील मागास. हा मागास उच्चभ्रू विद्यार्थी, मध्यम वर्गीय, किंवा त्याही खालच्या वर्गातील विद्यार्थी असू शकतो. (आर्थीक परीस्थिती नुसार) यालाही वाटते आपली कुणीतरी असावी. मग एकतर्फी 'ती' शोधणे सुरू होते. असे म्हटले जाते की प्रेम हे निसर्ग नियमाप्रमाणे आपोआप होते. पण शिक्षण क्षेत्रात किंवा कोणत्याही क्षेत्रात आजच्या जगात तो नियम लागू होत नाही. प्रेम करावे लागते. कराव्या लागणाऱ्या प्रेमात तरलता, विश्वास, निस्वार्थ, मैत्रीभावना या गोष्टी खुंटीवर टांगाव्या लागतात. मग अशातच मनासारखी 'ती' सापडली की एकतर्फी प्रेमाची सुरवात होते. त्यात नाही नाही ते एकपात्री प्रयोग करावे लागतात. ध्यास असतो फक्त 'ति'ला मिळवणे. 'ती' नाही मिळाली तर याचा प्रेमभंग, अपेक्षाभंग होवून  अपयशी ठरतो, नैराश्यग्रस्त होतो. त्यातून याचा अहंकारी पुरुष जागा  होतो. याचा पुरुषी अहंकार दुखावला गेल्यावर याच्यातील प्रेमभावनेची जागा सूडभावना घेते. 'सूडभावना व हिंसा या जुळ्या बहिणी  बलेच्या सख्या मुली आहेत'. प्रेमवीराच्या मनातील अहिंसा व सद्विविवेक बुद्धी या दोन सात्विक बहिणींना मारून एकतर्फी प्रेमवीराला या कजाग जुळ्या बहिणी आपल्या बाहूपाशात घेत त्याच्यावर पूर्णपणे हावी होवून त्या 'ती'ची हत्या करायला सांगतात त्याप्रमाणे तो करतो. आणि जिंदगीभर पुढील भयंकर परिणाम भोगत राहतो. 

(क्रमशः)

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!