प्रेम आणि हिंसा भाग – २.

४) वाचन संस्कृती आणि सोशल मिडिया: सोशल मीडिया आल्यापासून तरुणाईमध्ये वाचन संस्कृती कमी झालेली दिसून येते असली तरी काही तरूणांनी ती तरूणांमध्ये जिवंत ठेवली आहे. म्हणूनच विनायक होगाडे ‘डियर तुकोबा’ व शंतनू वावरे ‘Thanks God I am Indian’ असी काही तरूण पोरं ऐतिहासिक संदर्भावर पुस्तके लिहून शकतात. सोशल मीडिया आल्यापासून बहुसंख्य तरुणांमध्ये वाचन कमी होवून त्यांचे अंगठे मोबाईलच्या स्क्रिनवर नाचू लागले. अंगठ्याचे नाचने शास्त्रीय न वाटता पाश्चात्य वाटू लागले. म्हणजेच मोबाईलचा वापर विधायक कामासाठी, लिखाणासाठी न करता टिवल्याबावल्या किंवा नसले उद्योग करण्यासाठी होवू लागला. (अर्थात अपवाद वगळून) तरुणाईने हाच वेळ वाचनात घालवला तर तो नक्कीच सार्थकी लागू शकतो. पुस्तके विकत न घेता ही सोशल मीडियावर ऐतिहासिक पुस्तके तसेच इतर चांगल्या लेखकांची आयते पुस्तके उपलब्ध आहेत ती त्यांनी आवर्जून वाचायला पाहिजे. पण त्यासाठी मात्र वाचनाची आवड असावी लागते. नसली तरी ती त्यांनी निर्माण करायला पाहिजे. वाचन संस्कृतीने संभाषणात आपल्या व्यक्तीमत्वाची छाप इतरांवर पडत असते हे तररूणाईने लक्षात घेतले पाहिजे. आमच्या जमान्यात मोबाईलची सुविधा नव्हती. प्रत्येक वेळी नवीन पुस्तक विकत घ्यायला परवडत नसल्यामुळे आम्ही वाचनालयाचा पर्याय निवडत असू किंवा मित्र मैत्रिणींना मागत असू तरीही वाचनाची हौस भागवत असू. आमच्याच समकालीन असणारे ‘बलुतंकार’ दया पवार, ‘उपराकार’ लक्ष्मण माने, ‘चोरटा’ लक्ष्मण गायकवाड, ‘कोल्ह्याट्याचं पोर’ किशोर काळे या मंडळींना सामाजिक परिस्थितीने घडवले, शिकवले. ते जे शिकले ते त्यांनी पुस्तकात उतरवले. त्यांचे पुस्तके भाषांतरित होवून देश परदेशात गाजले. यांच्यापैकी दया पवार व लक्ष्मण माने यांना त्यांच्या पुस्तकांनी परदेश वाऱ्या घडवून आणल्या. तरुणाईने वाचन संस्कृती जोपासली असती तर आजच्या तरूणाला अहंकाराचा आणि अपराधी जगताचा स्पर्श झाला नसता.
५) मुलींमधे सिक्स सेन्स चा वापर करण्याचा अभाव: निसर्गाने स्त्री वर्गाला अपराधी शक्तींपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सिक्स सेन्स (सहावं इंद्रिय) च्या रूपात एक प्रकारे अदृश्य सुरक्षा कवच बहाल केले आहे. सिक्स सेन्स म्हणजे जो पुरुष एखाद्या महिला बाबत अन्याय अत्याचार करण्या अगोदर त्याची भिरभिरणारी नजर, असमंजस व अस्पष्ट बोलणे, त्याच्या हाताच्या स्पर्शात वेगळेपणा वाटणे, किंवा त्याची एकूणच देहबोली सामान्य माणसापेक्षा वेगळी वाटणे या त्याच्या सर्व असामान्य क्रिया टिपून त्याच्यापासून वेळीच सावध होण्याची कला साधने म्हणजेच सिक्स सेन्सचा वापर करणे होय. याबाबत महिला अधिक चांगल्या तऱ्हेने मार्गदर्शन करू शकतात. या स्त्री सुरक्षा कलेचा वापर करून महाविद्यालयीन विद्यार्थीनी आपल्या कुटुंबाला वेळीच कल्पना देवू शकतात. महाविद्यालय प्रशासनाला किंवा प्राचार्यांना कळवू शकतात. पण मुली ही खबरदारी घेत नाहीत. यामागे वेगवेगळ्या कारणांपैकी काही प्रमुख कारणे १) मुली घरी किंवा महाविद्यालयात कळवायला घाबरतात २) घरचे आपल्यालाच दोष देतील ही भीती ३) मुलींच्या बाबतीत असं घडतच असते म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे ४) घरचे शिक्षण बंद करू शकतात ही भीती ५) ‘तो’ आपल्या बाबतीत टोकाचे पाऊल उचलणार नाही असा समज करून घेणे. तर यामागे अशी काही कारणे असू शकतात. मुलगी गप असल्याचे पाहून अपराध्याचे फावते. व तो संधीच्या शोधात असतो. अपराध्याला संधी मिळाली की त्याची शिकार एक तर बलत्काराला बळी पडते किंवा आपला जीव गमावून बसते. असे रोज कुठे ना कुठे कमीअधिक प्रमाणात गुन्हे घडतात. यात काही धाडसी मुली, नशीबवान मुली वाचतात ज्या धाडसी किंवा नशीबवान नसतात त्यांच्या वाट्याला दुर्दैवी घटना घडतात. त्यातून काही प्रकाशात येतात, काही धन्नासेठ पैशाच्या जोरावर मामला रफातफा करतात, काही अंधारात गडप होतात, तर काहींना वाली नसतो. तर अशा आहेत स्त्री जन्माच्या कहाण्या. म्हणून मुलींनो या जगात निर्भय बना निडर बना आलेल्या संकटाशी दोन हात करण्याची तयारी ठेवा. समाज काय म्हणेल हा भांगूलबुवा मनातून काढून टाका व आपला हितचिंतक व आपला वैरी ओळखायला शिका त्यासाठी शिक्स सेन्स चा वापर करा. व आपलं स्वतःच संरक्षण स्वतःच करा.
(क्रमशः)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत