डुप्लीकेट एस.सींचा राजकीय पक्षात सुकाळ

“डुप्लीकेट एस.सींचा सुकाळ राजकीय पक्ष दिवसा-ढवळ्या करती मांगा-महारांचा विटाळ”
काॅंग्रेस आणि भाजपने अनुसूचित जातींसाठी राखीव असणाऱ्या जागांवर असे डुप्लीकेट उमेदवार उभे करुन राजकीय आरक्षणाचा खेळ खंडोबा चालविला आहे. लातुरला अनुसूचित जाती साठी राखीव जागेवर डॉ.काळगे हे डुप्लीकेट उमेदवार उभे केले आहेत .डाॅ.काळगे हे मूळचे जंगम या जातीचे. हि जात लिंगायत धर्मातील एक जात. लिंगायताचे धर्मगुरू म्हणजे जंगम.हिंदूंमध्ये जे स्थान व मान ब्राम्हणांना आहे तो लिंगायतांमध्ये जंगमांना आहे.
मात्र,डॉ.काळगे यांच्याकडे माला-जंगम या अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र असल्याने त्यांना ही सीट मिळालेली आहे. २०१९ शिवराज पाटील चाकूरकर यांनी डॉ.काळगे यांना लातूरच्या राखीव जागेसंदर्भात गेट आऊट या शब्दांत हाकलून लावले होते मात्र,आता अमित देशमुख यांनी डॉ.काळगे यांची उमेदवारी निश्चित केली.
अमरावतीची जागा अनुसूचित जातीसाठी राखीव असतांना नवनीत राणा या डुप्लीकेट एस.सी.उमेदवाराची पाठराखण भाजप करत आहे. २०१९ ला सोलापूरची लोकसभा सीट अनुसूचित जाती साठी राखीव होती मात्र भाजपने नुरंदस्वामी गुरुबसय्या हिरेमठ उर्फ डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी या नकली उमेदवाराला निवडून आणले. त्यांच्याकडे बेडाजंगम जातीचे प्रमाणपत्र होते मात्र ते वैधता मिळवू शकले नाहीत.
महाराष्ट्रातील नवबौध्द आणि मातंग समाज हे चळवळीतील समाज असल्याने आणि फुले-शाहु-आंबेडकर विचारांशी जुळलेले असल्याने सर्वचं राजकीय पक्ष यांचा जाणीवपूर्वक विटाळ करतांना दिसून येत आहेत.नकली उमेदवार उभे करुन त्यांना निवडून आणायचे मूळ ज्यांचा हक्क आहे त्यांना डावलायचे कोर्टात केस लांब खेळवायची आणि ५ वर्षांचा वेळ काढून घ्यायचा असा नवीन खेळ हे राजकीय पक्ष खेळत आहेत.
रामटेक लोकसभा सुध्दा अनुसूचित जाती साठी राखीव आहे.काॅंग्रेसचे किशोर गजभिये हे २०१९ ला या सीटवर लढल्याने आणि मागील पाच वर्षांपासून ते कार्यशील असल्याने त्यांची सीट पक्की होती मात्र,शेवटच्या क्षणी रश्मी बर्वे यांना सीट देण्यात आली. त्यांच्या कागदपत्रांबाबत असलेला घोळ निवडलेला नाही. दुसरीकडे भाजपाने त्यांचे कन्फर्म उमेदवार आणि भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाप्रमुख अरविंद गजभिये यांना डच्चू देऊन काॅंग्रेसचे राजु पारवे यांना आयात करुन त्यांच्या हाती धनुष्यबाण दिला.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उमरेड विधानसभेकरीता मातंग समाजाचे डॉ.आनंद खडसे हे भाजपचे खंदे शिलेदार आणि हक्कदार असतांना भाजपने सुधीर पारवे या खाटीक समाजाच्या उमेदवाराला संधी दिली. भाजपने अनुसूचित जातीमध्ये महार नवबौध्द आणि मातंगांची लोकसंख्या ही ९०% असतांना त्यांच्या हाती नारळ देण्याचे काम या पक्षांनी केलेले आहे.वंचित महाआघाडीत असतांना केवळ दोन जागांचे तुकडे देण्याची भाषा आघाडीने केली.मागील २०१९च्या निवडणुकीत अधिक मते घेणाऱ्या या पक्षाची आणि बाळासाहेबांची केलेली कुचेंबना आणि रासप, शेतकरी संघटनांची केलेली बोळवण यातून महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष हे मांगा-महारांचा एवढा तिरस्कार करतात की,त्यांच्याऐवजी खोट्या उमेदवारांना उभे करुन अनुसूचित जातीतील ९०% लोकसंख्या असणाऱ्या या दोन प्रमुख जातींना हरताळ फासण्याचेचं काम काॅंग्रेस आणि भाजपा करत आहेत.
महायुती आणि महाआघाडी याला जबाबदार आहे
अनुसूचित जातीतील अनेक नेते उघड डोळ्यांनी हा अन्याय होत असतांनाही या राजकीय पक्षांच्या सतरंज्या उचलतांना दिसत आहेत.ते समाजाच्या हितासाठी नव्हे तर, स्वतःचे घर भरण्यासाठी उष्टे खात आहेत.काही सामाजिक नेते तर काही हेवीवेट नेत्यांचा अर्ज भरण्यासाठी आपल्या चिल्ल्या-पिल्या-अंड्यासह रस्त्यावर पेढे भरवितांना दिसत आहेत.
अरे किती हा मिंधेपणा?
*वाघांचे छावे असूनही तरसांची चाकरदारी करता जनाची नाही तर मनाची ठेवा.
जय भीम! जय लहुजी !!जय शिवराय!!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत