पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चार कैदी जेलमधून फरार

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे कारागृहाचे गज कापून कैद्यांनी पलायन केले आहे. चार पोलीस कर्मचारी ड्युटीवर असताना कैदी पळाले आहेत. पोलीसांचा आरोपींना पळविण्यात पोलिसांचा सहभाग तर नाही याबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित आहे.
वर्षभरापूर्वी दोन आरोपींनी संगमनेर कारागृहातून पलायन केल्याची घटना घडली होती. आता पुन्हा एकदा चार आरोपींनी सकाळी सात वाजेच्या सुमारास चक्क कारागृहाचे गज तोडून पालन केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. चार पोलिस कर्मचारी ड्युटीवर असताना उपकरागृहातील गज कापून पलायन केले आहे. आरोपींनी कारागृहाचे जाड गज कापून पलायन केले. लोखंडाचा एवढा मजबूत गज आरोपींनी कोणत्या कटरने कापला असा प्रश्न देखील उपस्थित झाला. या धक्कादायक प्रकारामुळे संगमनेर पोलिस सुरक्षा व्यवस्थे संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राहुल काळे , मच्छिंद्र जाधव , रोशन थापा ददेल , अनिल काळे असे जेलमधून पसार झालेल्या आरोपींची नावे असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पाच पथके रवाना केल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी दिली. जेलमधून पलायन करणाऱ्या या चारही आरोपींवर बलात्कार आणि खून अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत