शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी न लावल्यास मंगळवारी जिल्हा कृषी कार्यालयात तोडफोड करू – राजेंद्र पातोडे

अकोला, दि. २ – राजंदा येथील नऊ शेतकरी गेले वर्षभर अनुदान साठी फेऱ्या मारत असून त्या शेतकऱ्यांनी आज दिवसभर किरवे ह्यांचे कार्यालयात ठिय्या मांडला असताना जिल्हा कृषी अधीक्षक बेजबाबदार पद्धतीने कार्यालय सोडून गेले.पोलीस आणि वंचित युवा आघाडीचे पदाधिकारी पोहोचल्यावर नाईलाजाने उपस्थित अन्य अधिकारी ह्यांनी मंगळवार पर्यंत प्रश्न सोडविण्याचे लेखी दिले असून मंगळवार पर्यंत संबंधित शेतकऱ्याचे काम न झाल्यास कृषी अधीक्षक कार्यालयात तोडफोड करू असा इशारा युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी दिला आहे. पोखरा योजनेतून ग्राम राजंदा येथील शेतकरी संतोष वनवे,राजु सोळंके, ज्ञानेश्वर खांडे पाटील, विनोद तायडे, निशांत घुगे,विजु भगेवार, प्रविण पांडे, शिवाजी बावस्कर यांनी व त्यांचे कुटुंबांनी संत्रा लागवड केली होती.त्यानंतर फिल्ड विजिट करून बील ऑनलाईन करने अपेक्षित होते.मात्र तत्कालीन कृषी सहाय्यक आणि तालुका कृषी अधिकारी ह्यांनी आर्थिक मोबदला मिळत नसल्याने ही प्रक्रिया केली नाही आणि दोघे बदलून गेले.त्यावर सर्व शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक कीरवे ह्यांची वारंवार भेट घेतली मात्र त्यांची बोळवण करण्यात आली.त्यामुळे आज त्या शेतकऱ्यांनी किरवे ह्यांचे कार्यालयात ठिय्या मांडला. जिल्हा कृषी अधीक्षक जुजबी बोलून निघून गेले.मात्र शेतकरी रात्री आठ पर्यंत जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात होते.अधिकारी दाद देत नसताना त्यांनी पोलीस बोलावले.त्यावर शेतकऱ्यांनी युवा आघाडीचे पदाधिकारी ह्यांना पाचारण केले.आणि राज्य महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी पोलिसा समोर उपस्थित अधिकाऱ्याचा क्लास लावला.तातडीने लेखी आश्वासन देवून दिलेल्या मुदतीत पूर्ण करा अन्यथा आमच्याशी गाठ आहे, असा सज्जड दम भरला.त्यावर अधिका-यांनी मंगलवार पर्यंत सोडविण्याचे आश्वासन दिले आणि शेतकऱ्यांनी ठिय्या मागे घेतला.दिलेल्या मुदतीत अधिका-यांनी अनुदान मंजूर न केल्यास कार्यालयास लक्ष करू अशी तंबी देखील पातोडे ह्यांनी दिली.
यावेळी युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे,शहर अध्यक्ष शंकरराव इंगळे, युवा शहर अध्यक्ष जय तायडे,विजय शिंदे,
सचिन शिराळे, आकाश जंजाळ, सोशल मिडिया प्रमुख ऍड प्रशिक मोरे, नागेश उमाळे,आकाश गवई, अमोल सोनोने, संतोष कांबळे हे आणि खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार व पोलीस कर्मचारी तसेच कृषी अधीक्षक कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत