“भारतीय अर्थव्यवस्था मजबूत” हा केवळ ब्रह्माचा भोपळा- अर्थतज्ञ रघुराम राजन

मुंबई : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारतात चालू असलेल्या निवडणुकीच्या तोंडावर एक महत्वाचे विधान केले आहे. राजन यांनी म्हटले की भारताची अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे दर्शविणारा विकास डेटा एक ‘ भ्रमाचा भोपळा’ आहे आणि त्यावर विश्वास ठेवून मतदारांनी सरकार निवडले तर भारत मोठी चूक करत आहे.
रघुराम राजन यांच्या मते निवडणुकीनंतर कर्मचाऱ्यांचे शिक्षण आणि कौशल्ये सुधारणे हे नव्या सरकारसमोरील सर्वात मोठे आव्हान असेल. या समस्या सोडवल्याशिवाय भारत आपल्या तरुण लोकसंख्येचा फायदा घेण्यासाठी संघर्ष करेल. तेही अशा देशात जिथे १.४ अब्ज पेक्षा जास्त लोकसंख्येपैकी निम्म्याहून अधिक लोकसंख्या ३० वर्षांपेक्षा कमी आहे.
भारतातील मतदारांनी आर्थिक वाढीच्या या फसव्या प्रचारावर विश्वास ठेवल्यास त्याची सर्वात मोठी चूक होईल. ही प्रगती प्रत्यक्षात आणण्यासाठी अजून बरीच वर्षे काम करायचे आहे, पण अनेक ‘राजकारणी’ तुम्हाला खात्री देऊ इच्छितात की हा प्रचार खरा आहे आणि आपली वेळ आली आहे. ही भारतासाठी, येणाऱ्या पुढील पिढ्यांसाठी मोठी चूक असेल.”
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत