मुख्यपानविचारपीठसंपादकीय

खरा धम्मचक्र प्रवर्तन दिन !….


डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजया दशमी या मंगलदिनी 14 ऑक्टो 1956 साली आपल्या लाखो अनुयाया समवेत बौद्ध धम्माचि दीक्षा घेतली . अशा प्रकारे जगातील रक्तविरहित धम्मक्रांति घडवली. त्या नंतर अवघ्या 53 दिवसांमधे बोधिसत्व ड़ॉ बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले . त्यामुळे डॉ. बाबासाहेब अम्बेडकरांनी अशोक विजया दशमी हा दिवस महत्वाचा मानुन धम्मदीक्षा घेतली की, 14 ऑक्टो ही तारीख नज़रे समोर ठेवून धम्मदीक्षा घेतली?या प्रश्नाचे उत्तर शोधणे अतिशय महत्वपूर्ण वाटते !

इतिहास लेखनाला दोन गोष्टींचा आधार घेतला जातो . आपल्याला देखील वरील प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी दोन पातळ्यांवर चिंतन करावे लागेल 1) तार्किक 2) तथ्य (facts)

प्रथमतः 1) तार्किक

14 ऑक्टो ही तारिखच का निवडली ?

या प्रश्नावर जर चिंतन केल्यास एक मूळ प्रश्न उभा ठाकतो तो म्हणजे …
… या दिवसासंदर्भात असा काय इतिहास घडला आहे ?
उत्तर: काहीच नाही !

मित्रांनो !… या बाबत समाधानकारक उत्तर मिळत नाही !…

आता आपण अशोक विजया दशमी बाबत चिंतन करुया …

अशोक विजया दशमी हा दिवासच का निवडला बाबासाहेबांनी ?…

आपण सर्वाना हे ज्ञात आहे की कलिंग देशावर सम्राट अशोकने स्वारी केलि . या युद्धात भयंकर नरसंहार झाला. हा नरसंहार पाहून सम्राट अशोक पश्चातापामुळे अगदी खचुन गेला , विजय मिळवून देखील सम्राट अशोकाला मनःशांती मिळत नव्हती . अशा परिस्तिथित निग्रोध नावाच्या भिक्खुनि केलेल्या उपदेशामुळे सम्राट अशोकाचे मनःपरिवर्तन झाले व त्याने बौद्ध धम्मचा स्वीकार केला . तो दिवस म्हणजे अशोकविजयादशमी म्हणून ओळखला जाऊ लागला. याच मंगलदिनी सम्राट अशोकने दहा धर्माज्ञा जाहिर केल्या. या दहा आज्ञा म्हणजे दशहरा सीमोल्लंघन होय ! पूर्वीच्या वैदिक धर्माची सिमा ओलांडून सम्राट अशोकने आपल्या प्रजाजना समवेत बौद्ध धम्मात प्रवेश केला ! हाच सण पुढे अशोक विजयादशमी दसहरा म्हणून साजरा करण्याची प्रथा पडली !
बौद्ध धम्माचा ऱ्हास होते वेळेस भारतीयान्ची अस्मिता बौद्ध धम्मपासून वेगळे करण्यासाठी वैदिक हिंदुनि ज्या प्रकारे महाभारत, रामायण लिहन्याचा खटाटोप केला , कपोलकल्पित वैदिक देवीदेवताचे अस्तित्व त्यांनी ग्रंथांद्वारे प्रमाणित केले , रामायण महाभारत अशी महाकाव्य प्रत्येक्षत इतिहास होती असे भसवण्यासाठी अस्तित्वात असलेल्या स्थळांचा सन्दर्भ जोडला( उदा. कुरुक्षेत्र,रामसेतु इ) त्या प्रमाणे अशोकविजया दशमी या सणाला देवी देवतांचा सन्दर्भ देवून त्याला धर्मशास्त्रांचा आधार देवून प्रमाणित करण्यात आले !…

बौद्ध धम्मतिल सर्वच सण हे चंद्राच्या कलेप्रमानेच !

काहि लोकांचा आक्षेप असतो की हिन्दू धर्माच्या तिथिप्रमाने असलेला सण का साजरा करायचा ?

बुद्धांच्या जीवनात ज्या महत्वपूर्ण घटना घडल्या त्या बऱ्याच घटना पौर्णिमा किंवा अमवस्येच्या दिवशी घडल्या आहेत किंवा धम्मदीक्षेच्या घटना मुद्दाम पौर्णिमेच्या दिवशी आयोजित करण्यात आल्या आहेत . त्याचप्रमाणे सम्राट अशोकने अश्विन शुद्ध दशमीला, भंते उपगुप्त यांच्या हस्ते बौद्ध धम्माचि दीक्षा घेतली (सदर दिवासचे महत्त्व बाबासाहेबांनी जानीले होते) ,याचाच अर्थ चंद्राच्या कलेला बौद्ध संस्कार म्हणून धम्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे ! बौद्ध धम्मात कालमापन पद्धति ही चंद्राच्या कलेवर आधारित असते ( हिंदूंच्या तिथिनुसार नव्हे!) . ख्रिस्ताचा जन्म बुद्धांच्या जन्माच्या 563 वर्षांनंतर झाला , ज्या दिवशी बुद्धांचा जन्म झाला त्या दिवसापासून बौद्ध दिनदर्शिकेची चंद्राच्या कलेनुसार सुरुवात मानली जाते ! भगवान बुद्धांचि जयंती ही ख्रिस्ती दिनदर्शिके नुसार साजरी केलि जात नाही ती वैशाख पौर्णिमेलाच साजरी केलि जाते , मग धम्मचक्रप्रवर्तनदिन हा ख्रिस्ती दिनदर्शिकेवर आधारित का साजरा करावा ?

तसेच …

धम्मदीक्क्षेच्या वेळेस डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिल्या त्यातील सातवी प्रतिज्ञा
” मी बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत
असे कोणतेही आचरण करणार नाही.” असे
असताना डॉ बाबासाहब आंबेडकर सारखे प्रकांड पंडित व बौद्ध धम्माचे अभ्यासक आपल्या अनुयायाना उद्धेषुन PTI(प्रेस ट्रस्ट ऑफ़ इंडिया) ला पत्र पाठवतात की “मी दासऱ्याच्या दिवशी धम्मदीक्षा घेण्याचे निश्चित केले आहे .” याचे कारण तार्किक दृष्टया असे निघते की डॉ अम्बेडकरांना पूर्णपणे जाणीव होती की दशहरा (दसरा) हा बौद्धांसाठी अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे , या दिवशी सम्राट अशोकने धम्मदीक्षा स्वीकारली होती !…

…आता आपण तथ्याच्या आधारावर चिंतन करू …

2) तथ्य

“…कलिंगच्या युद्धात झालेल्या मानवी संहारामुळे दुक्खित होऊन तलवारीच्या सहाय्याने मानवांची हत्या करुण विजय मिळवण्यापेक्षा धम्माच्या सहाय्याने मने जिंकने श्रेयस्कर असा विचार करुण आपली तलवार सम्राट अशोकने ज्यादिवशि म्यान केलि तो दिवस म्हणजे अशोक विजयादशमीचा दिवस. तेंव्हापासून भारतात अशोक विजयादशमीच्या दिवशी उत्सव साजरा केला जातो. कारण त्या दिवशी मैत्री , करुणा, प्रज्ञेने क्रुरतेवर विजय मिळवला. म्हणूनच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजयादशमीचा दिवस आपल्या धम्मदीक्षेसाठी निवडला ….”

—- सन्दर्भ: महाराष्ट्रातील बुद्ध धम्मचा इतिहास
लेखक: इतिहासकार मा शं मोरे

भंते निग्रोध यांच्या उपदेशा नंतर अश्विन शुद्ध दशमि ला
भंते उपगुप्त यांच्या हस्ते सम्राट अशोकने बौद्ध धम्माचि दीक्षा घेतली. धम्म दीक्षेच्या वेळी धम्मचक्र प्रवर्तनाय (अनुवर्तनाय नाही !) संकल्प उदघोषित करुन , बौद्ध धम्म अचारसंहितेवर आधारित दसहरा(दस + हरा पालीे शब्द “हरा “म्हणजे “घेवून जाणारा “) वैदिक धर्मापासून दूर बौद्ध धम्मकडे घेवून जाणारा अधिकृत दसकलमि जाहिरनामा म्हणजे दसहरा प्रजेसाठी लोकनीति व धर्मनीति म्हणून प्रसारित केला . हाच प्रजाधर्म, नितिधर्म , राजधर्म समजून सर्वानी त्यांचा आदर करावा अशी राजाज्ञा जाहिर केलि . या राजाज्ञा जिथे जिथे तथागताच्या जीवनातील महत्वपूर्ण घटना घडल्या त्या ठिकाणी स्तम्भ उभरूंण त्या स्तंभावर शिलालेख रूपात कोरण्यात आल्या. अशा प्रकारे इ स पूर्व 254 पासून अशोक विजया दशमिचा दसहरा म्हणजेच त्याचाच अपभ्रंश दसरा म्हणून सण साजरा केला जाऊ लागला .

सम्राट अशोकने प्रजेला उद्धेषुन जी राजाज्ञा रूपी नितितत्वे विविध अशोक स्तम्भावर कोरली ती तत्वे पुढील प्रमाणे…

1) धार्मिक स्थळी व कार्यक्रमात पशुहत्या किंवा पशुबळी न कारणे

2) चोरी , फसवणूक, लुबाडनुक इ न करणे

3) परस्त्रीगमन , व्यभिचार न करणे .

4) खोटे न बोलने , गैर व्यवहार न करने .

5) सार्वजनिक व पवित्र स्थळी मद्यपान न करने

6) नास्तिकपना , सत्कार्य व मनुसकिचा तीटकारा सोडून देणे

7) व्यक्ति गुणांने श्रेष्ट मनावा , त्याच्या जातीने नव्हे .

8) वैर सोडून दिल्यानेच वैर शांत होते हे विसरु नये.

9) धर्मगुरुनि सांगितलेले बहुजन हिताय बहुजन सुखाय व सदाचार हे आपले आचरण विसरु नये .

10) निति नियमांचे पालन करण्यास अमृताचा लाभ , नाहीतर मृत्युशी गाठ हे विसरु नये .

अशा प्रकारे सदर राजाज्ञा द्वारे सम्राट अशोकने बौद्ध धम्मास राजाश्रय देवून धम्माचे पालन करने हे आपल्या राज्यात बंधनकारक केले !

सदर राजाज्ञाचा United Nation’s Declaration Of Human Rights ने आपल्या Manifesto (जहिरनाम्यात) समावेश केला आहे ही सर्व बौद्धांसाठी अभिमानास्पद बाबआहे !

(सन्दर्भ: Story of India – documentary by Michel Palin, BBC)

आता आपण बाबासाहेबांनी अशोक विजयादशमी हा दिवसच का निवडला, याबाबत तथ्य आणि पुराव्यांचा विचार करू …

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुर हे स्थळ नागवंशी म्हणजेच बौद्ध राज्याची राजधानी म्हणून निवडले , तसे स्पष्टीकरण त्यांनी 5 ऑगस्ट 1956 ला सोहनलाल शास्त्री यांच्या सोबत झालेल्या बैठकीत त्यांना विचारलेल्या प्रश्ना प्रसंगी दिले होते. ( सन्दर्भ : चांगदेव खैरमोडे लिखित डॉ आंबेडकर चरित्र खंड 12) त्या प्रमाणेच अशोक विजया दशमी दासऱ्याच्या दिवसचे महत्त्व जाणूनच बाबासाहेबांनी हा दिवस धर्मान्तरास निश्चित केला …

त्या संदर्भात प्रमाणित (Authenticated) पुरावे पुढील प्रमाणे …

पुरावा क्र. 1

डॉ . आंबेडकरांनी PTI(Press Trust of India) ला उद्धेषुन 23 सप्टेम्बर 1956 रोजी एक पत्र लिहले त्या पत्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्पष्ट शब्दात सांगतात की… धम्मदीक्षा हा सोहळा दासऱ्याच्या दिवशी पार पडेल ! त्याचा सन्दर्भ पुढील प्रमाणे !…

प्रा. चांगदेव खैरमोडे लिखित महाराष्ट्र शासन प्रकाशित डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र ग्रन्थ खंड 12 पृ 27 ,28 मधील सन्दर्भ अतिशय महत्वाचा आहे तो पुढील प्रमाणे….

….श्री गोडबोले सात आठ माणसे घेवून दिल्लीला आले . बाबासाहेबांनी सर्वंशि विचारविनिमय करुण सर्व कार्यक्रम निश्चित केला. आणि दीक्षेची तारीख 14 ऑक्टो 1956 विजयादशमी ही निश्चित केलि. 23 सप्टेम्बरला बाबासाहेबांनी वृत्तसंस्थाना निवेदन पाठवले की हा समारम्भ 9 ते 11 च्या दरम्यान होईल. हे निवेदन प्रेस ट्रस्ट ऑफ़ इंडिया( PTI ) यावृतसंस्थेने प्रसारित केले….

बाबासाहेबांनी प्रेस ट्रस्ट ऑफ़ इण्डियाला निवेदनपर पत्र पाठवले ते पुढीलप्रमाणे…

               26, अलीपुर रोड
               दिल्ली,23 सप्टे 1956

” बौद्ध धम्म स्वीकारण्याचा दिवस व ठिकाण मी आता निश्चित केले आहे, “दसऱ्याच्या” दिवशी तारीख 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपुर येथे मी बौद्ध धम्म दीक्षा घेणार आहे.

या दिवशी सकाळी 9 ते 11 माझा धम्मदीक्षा समारम्भ होईल व संध्याकाळी माझे सर्व लोकांसाठी जाहिर व्याख्यान होईल.”

              बी. आर आंबेडकर
               23-09-1956

(प्रबुद्ध भारत : आंबेडकर बौद्ध दीक्षा विशेषांक दिनांक 27-01-1956, पा.29)

PTI ला दिलेल्या वरील पत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आवर्जून दासऱ्याच्या उल्लेख करतात ..

पुरावा क्र.2

14 ऑक्टो 1956 साली बाबासाहेबांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत धम्मदीक्षा घेवून धम्मचक्र प्रवर्तन केले त्या वेळेस जी निमंत्रण पत्रिका प्रकाशित करण्यात आली त्यातील मजकूर पुढीलप्रमाणे …

         ||  समुदाइक धर्मान्तर ||

भारतीय बौद्धजन समितिचे संस्थापक व अध्यक्ष परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा बौद्धधर्म ग्रहण विधि पूज्यभिक्खु चंद्रमणि महास्थविर यांच्या हस्ते नागपुर येथे रविवार ,तारीख 14 ऑक्टो 1956 “विजयादशमी दिवशी ” सकाळी 8 वाजता साजरा होईल .

सदर निमंत्रण पत्रिकेत स्पष्ट शब्दत ‘विजयादशमी ” या दिवासाचा उल्लेख आढळतो !

पुरावा क्र. 3

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण नंतर एक वर्षाने 3 ऑक्टो 1957 (14 ऑक्टो नव्हे !) रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमा दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमाला पूज्य भंदन्त आनंद कौसल्यायन , यशवंतराव आंबेडकर , एन शिवराज, दादासाहेब गायकवाड़, दादासाहेब रूपवते, बॅ.राजाभाऊ खोब्रागड़े इ. बाबासाहेबांच्या सोबत खांद्याला ख़ान्दा लावून चळवळ चलावणारे महानुभाव उपस्थित होते . दादासाहेब गायकवाड़ तर बाबासाहेबांच्या सावलिसारखे सोबत होते , बाबासाहेब दादासाहेब गायकवाडांपाशी तर आपल्या वैयक्तिक कौटुम्बिकबाबी बाबत देखिल सल्लामसलत घेत असत ते दादासाहेब सदर कार्यक्रमस हजर होतेे ,त्यांनी देखील सदर प्रसंगी आक्षेप घेतले नाही . डॉ. अम्बेडकरांनंतर जर कोणी बौद्ध धम्माचे गाढ़े अभ्यासक असतील तर ते भदंत आनंद कौसल्यायन होत . ते देखील सदर कार्यक्रमस हजर होते , त्यांना बौद्ध धम्माच्या विसंगत कृत्य वाटले असते तर त्यांनी आक्षेप घेतला नसता का ? . हे सर्व विचरवंत मंडळी उपस्थित असताना, एकाही महानुभवांनि या अशोक विजया दशमी दिवशी आयोजित कार्यक्रमास आक्षेप घेतला नाही ,कारण या सर्वाना त्या दिवसाचे महत्त्व ज्ञात होते.

धम्मचक्र प्रवर्तन दिनाबाबत संभ्रम निर्माण करणारी ही बाब अतिशय गांभीर्याने घेण्यासारखी आहे .. कारण ज्या प्रमाणे शिवजयंतीच्या तारखेवरुन गोंधळ निर्माण करुण शिवजयंतीचे महत्त्व कमी करण्यात आले त्या प्रमाणे काहि मनुवादी वृत्तिचे लोक , 14 ऑक्टो . हाच धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे, अशोकविजया दशमी दसहरा नव्हे ! असे बिम्बवुन त्या दिवासचे महत्त्व कमी करण्याचे षड्यंत्र करू पाहत आहेत ! असे लोक डॉ बाबासाहेबांनी धम्मचक्र जे प्रवर्तित(वैचारिक गति प्रदान करने) केले त्या धम्म चक्राच्या गतिला खीळ घळण्यास प्रयत्नरत आहेत !

अशोक विजयादशमी दसहरा (दसरा) मोठ्या हर्षोल्हासात साजरा करा !

जागृतिचा विस्तव तेवत ठेवा ! प्रबुद्ध व्हा !!
जय भीम !
धम्म संदेश प्रसारक
अशोक तुळशीराम भवरे सिडको, नांदेड.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!