समता सैनिक दलाच्या स्थापना दिना निमित्त..

परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या मानवमुक्तिची लढाई त्यासंबंधी निर्माण होणारे प्रश्न विरोधकांकडून होणारे हल्ले सभा संमेलनात गोंधळ घालणे.मिलटरी मधून सेवानिवृत झालेल्या सैनिकांनी एकत्रीत येऊन परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना सांगितले की आम्ही समाजातील तरूणांना सैनिकी शिक्षण देऊन विरोधकांचा बंदोबस्त लावू व आपल्या चळवळींचे संरक्षण करू.
चवदार चळवळींचा सत्याग्रह पुढे होता.बाबासाहेब यांनी सहमती दिली व समता सैनिक दलाची स्थापना झाली.समता सैनिक दलाची चोख व्यवस्था ठेऊन सत्याग्रह यशस्वी केला. प्रत्येक चळवळीत समता सैनिक दलाची उत्तम कामगिरी राहिली आहे. शिस्तबद्ध असणारे संघटन विरोधकही स्तुती करत असत संघटन असावे तर ड
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता सैनिक दला सारखे.समता सैनिक दलाचे कार्यकर्ते तयार होऊन शेड्युल कास्ट फेडेरेशन व पुढे रिपब्लीकन पक्षांची कार्यकर्ते म्हणून कार्य करत असत.
बाबासाहेब आंबेडकर ह्यात असेपर्यंत समता सैनिक दल एकजुट होते.विरोधकावर वचक होता होणा-या अन्याय अत्याचाराच्या विरोधात संघर्ष करिता असतं म्हणून पिडीत व्यक्तीला आधार वाटत होता.
1946ला नागपूरात झालेल्या हिन्दु महारांच्या जगभरात सर्व ओबीसी जातींनी स्मरा केला असता समता सैनिक दलाच्या सैनिकानी मुकाबला करून आंबेडकरी रक्ताची ओळख करून दिली.हा झगडा कामगार नेता रामभाऊ रूचकर नावाच्या ब्राम्हण व्यक्तीच्या चिथावणीखोर भाषणामुळे झाले अनेकांचे प्राण गेले घराची राखण रांगोळी झाली .मिल मध्ये बाई कामगार म्हणून कामावर जाताना त्यांना छळले जात होते. तेव्हा समता सैनिक दलाची कार्यकर्ते संरक्षण करिता असतं.
1957ला रिपब्लिकन पक्ष स्थापनेच्या वेळेस समता सैनिक दलाचे अखिल भारतीय अधिवेशन होऊन अखिल भारतीय अध्यक्ष म्हणून कर्मवीर बांबू हरिदास आवळे यांची निवड झाली.
भारतीय बौद्ध महासभा यशवंतराव आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होते. एकसंघ एकजुट संघटन असल्यामुळे व्यवस्थेला कापरे भरले. त्यांनी कच्चे दुवे हेरून चळवळीत फूट पाडली.समता सैनिक दल गटातटात विखुरला गेला.विचार एक नेता एक झेंडा एक असताना गटबाजी का
गटाधिपतीचा अहंकार मलाच समता सैनिक दल कळला आहे असा प्रकारचा गैरसमज असल्यामुळे केवळ परेड करण्यापेक्षा दुसरे कार्य नाही.
समता सैनिक दलाच्या सैनिक कोणत्याही विचारांच्या रंगाच्या राजकिय पक्षात काम करतो . निवडणूक लढतो. वास्तविक समता सैनिक दलाच्या सैनिक रिपब्लीकन पक्षाचा कार्यकर्ता होने अपेक्षित आहे.
समता सैनिक दलाच्या स्थापनानेला 95 वर्षे पूर्ण होत आहे.हया पार्श्वभुमीवर सर्वच दलाच्या गटधिपतीनी आंबेडकरी विचारांची राजकिय सामाजिक धार्मिक संघटना एकजूट एकसंघ करण्याच्या दृष्टिने विचार करून एकतेचा प्रयत्न करतील ही अपेक्षा.
विनायकराव जामगडे
7823093556
9372456389
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत