महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

भगवान बुद्धांची शिकवण-भाग ८५

देवदत्त: चुलत भाऊ आणि शत्रू

देवदत्त हा तथागत बुद्धांचा चुलत भाऊ होता. पण प्रथमपासूनच तो तथागत बुद्धांचा द्वेष करीत असे आणि त्याला त्यांच्याबद्दल तीव्र घृणा वाटत असे.
आपल्याला संघप्रमुख न करता सारिपुत्त आणि मोग्गलायनांना ते स्थान दिले ह्याबद्दल देवदत्ताचा तथागत बुद्धांवर रोष होता. देवदत्ताने तथागत बुद्धांवर तीनदा प्राणघाताचे प्रयत्न केले. पण तो एकदाही यशस्वी झाला नाही.
एकदा तथागत गृध्रकूट पर्वताच्या पायथ्याशी सावलीत येरझारा करीत होते.
देवदत्त वर चढला आणि तथागतांचे प्राणहरण करण्याच्या हेतूने त्याने एक मोठा दगड खाली लोटून दिला. पण तो एका खडकावर आदळला आणि तिथल्या तिथे गाडला गेला. फक्त त्याचा एक लहान तुकडा तथागतांच्या पायावर येऊन आदळला आणि त्यामुळे थोडे रक्त आले.
देवदत्ताने बुद्धांचे प्राण घेण्याचा दुसऱ्यांदा प्रयत्न केला.
ह्या वेळी देवदत्त राजकुमार अजातशत्रूकडे गेला. त्यांच्या मदतीने एकाला सांगण्यात आले की, श्रमण गौतमाची हत्या करा.” मात्र तो परत आला आणि त्याला म्हणाला, “मी तथागतांचे प्राणहरण करण्यास असमर्थ आहे.”
त्याने आणखी तथागतांचे प्राणहरण करण्याचा तिसऱ्यांदा प्रयत्न केला.
ह्या समयी राजगृहात नालागिरी नावाचा क्रूर नरघातक हत्तीला तथागत बुद्धांना मारण्यासाठी त्यांच्या मार्गात मोकळे सोडले होते. पण तो यशस्वी झाला नाही.
जेव्हा हे प्रयत्न उघडकीस आले तेव्हा देवदत्ताला प्राप्त झालेल्या सर्व सार्वजनिक नेमणूका रद्द झाल्या आणि नंतर अजातशत्रूनेही त्याला भेटीगाठी नाकारल्या. नालागिरी प्रकरणानंतर देवदत्ताचा प्रभाव संपूर्ण नष्ट झाला.
आपल्या कृत्यामुळे अप्रिय झाल्यामुळे देवदत्त मगधदेश सोडून कोशलदेशात गेला. राजा प्रसेनजित आपले स्वागत करील अशी त्याची अपेक्षा होती. पण प्रसेनजितने त्याला तुच्छतेने वागणूक दिली आणि त्याला हाकलून दिले.
ब्राम्हण आणि तथागत बुद्ध
एकदा पुष्कळ भिक्खूंसमवेत तथागत कोशलदेशात परिभ्रमण करीत असता ते थून नामक ब्राम्हण ग्रामात जाऊन पोहोचले.
थून गावातील ब्राम्हण गृहस्थांच्या कानांवर बातमी आली की, श्रमण गौतम आपल्या गावातील शेतात येऊन पोहोचले आहेत.
ब्राम्हण गृहस्थ स्वभावाने लोभी, असत्य मताचे आणि अश्रद्ध होते. ते म्हणाले, “जर श्रमण गौतम ह्या गावात प्रवेश करतील व दोन तीन दिवस वास्तव्य करतील तर सर्व ग्रामस्थ त्यांचे उपासक बनतील. मग ब्राम्हण धर्माला आधार राहणार नाही. ह्यासाठी त्यांच्या ग्रामप्रवेशाला प्रतिबंध केला पाहिजे.”
द्रोण नामक एक ब्राम्हण तथागतांजवळ गेला आणि त्याने त्यांना अभिवादन केले. कुशल समाचार विचारुन तो त्यांच्याजवळ बसला. असे बसल्यावर द्रोण तथागतांना म्हणाला,
“श्रमण गौतम! मी असे ऐकले आहे की, तथागत वयोवृद्ध आदरणीय ब्राम्हणांना अभिवादन करीत नाही, उभे राहात नाहीत किंवा आसनही देत नाहीत.”
तथापि यावर श्रमण गौतमाचे यथोचित म्हणणे ऐकून, “आपण मला उपासक म्हणून स्वीकृत करण्याची कृपा करावी, येणेकरुन जीवीत असेपर्यंत आपल्या आश्रयाचा अनुग्रह मला प्राप्त होईल.” असे म्हणून ते तथागतांचे उपासक झाले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!