धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मिरवणुकीत प्रथमच मातंग समाजातील युवकांचा लेझिम ताफा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगरात लेझीम सराव सुरु !

सोलापूर : चलो बुद्ध की और चा संदेश देत सोलापूर शहरातील बुधवार पेठेतील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगरातील मातंग समाज बांधवांच्या वतीने यंदा प्रथमच धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लेझीम ताफ्यासह मिरवणुकीत काढण्यात येणार आहे. या निमित्ताने लेझीमचा सराव सुरू करण्यात आला आहे.
यंदा 67 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सोलापूर शहरात विविध बौद्ध वस्त्यांमध्ये अनेक तरुण मंडळाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीसाठी लेझीमचा सराव उत्साही वातावरणात सुरू आहे. त्याचबरोबर बुधवार पेठेतील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथे जय मल्हार चौकात मातंग समाजातील युवकांनीही धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लेझीम ताफ्यासह मिरवणूक काढण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी लेझीमचा सराव सुरू केला आहे. मातंग समाज बांधवांच्या वतीने प्रथमच धम्मचक्र प्रवर्तन दिनी मिरवणूक करण्यात येत आहे.
दरम्यान, यानिमित्त येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरात लेझीम सराव उपक्रमाचे उदघाटन जी.एम.संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन करून सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली.
यावेळी मातंग समाजातील युवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या बुद्ध धम्माच्या मार्गाने जाण्यासाठी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लेझिम ताफा काढण्यात येत असल्याबद्दल जी.एम.मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेतर्फे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांनी मातंग समाजातील भिमसैनिक जेष्ठ नेते युवराज पवार, संयोजक अमर पवार, हणमंत पवार , श्रीकांत गायकवाड, ज्योतिबा धडे, अक्षय चव्हाण, विष्णु जाधव, तानाजी पाटोळे, जितु जाधव, पवन, उमेश पवार, गायकवाड, अविनाश पवार , गणेश पवार भिमसैनिकांना पंचशील फेटा,पंचशील शाल घालून पेढे भरवून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अजीत बनसोडे, रॉकी बंगाळे, पप्पु गायकवाड, दत्ता शिंदे , कनिष्क वाघमारे, विकी सोनवणे, अजय गायकवाड, संजय इंगळे, निशांत वाघमारे , नेहाल क्षीरसागर , डॅनी रामगल, यशराज बनसोडे ,संदिप, अंकुश आदींसह मित्र परिवार उपस्थित होता.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत