सख्खा भाऊ पक्का वैरी! शेतजमिनीच्या वाटणीवरून भावाच्या डोक्यात धारदार शास्त्राने वार करून खून

बीड जिल्ह्यात जमिनीच्या वादातून सख्या भावाने भावाचा खून केल्याची घटना समोर आली आहे . बीडच्या तिप्पटवाडी येथे जमिनीच्या वादातून भावानेच भावाची हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. बळीराम ज्ञानदेव शेंडगे (वय 40) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मृत बळीराम शेंडगे हे त्यांच्या वडिलांची जमीन भावांना वाटून मागत होते. मात्र त्यांचा भाऊ बबन ज्ञानदेव शेंडगे या वाटणी करण्यास टाळाटाळ करत होता. याच वादातून काही दिवसांपूर्वी दोघां भावांमध्ये किरकोळ वाद सुरू असताना बबन शेंडगे याने भाऊ बळीराम शेंडगे यांच्या डोक्यात धारदार शास्त्राने वार केला. या हल्ल्यात बळीराम शेंडगे गंभीर झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात होते, मात्र काल त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत