‘त्या’ प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी – आमदार रोहित पवार.

पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी आपल्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात दादांनी येरवड्यातील पोलीस खात्याच्या जमिनीचा लिलाव करण्यास सांगितल्याचा आरोप केला. तसेच त्याला त्यांनी विरोध केल्याचंही नमूद केलं आहे. मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकातील मुद्दे समोर येताच राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
मीरा बोरवणकर यांनी ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकामधून अजित पवार यांच्यावर जमिनी देण्यावरून गंभीर आरोप केले आहेत. त्याबाबत आमदार रोहित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, मी स्वतः बांधकाम क्षेत्रात नाही. त्यांनी काय आरोप केले मला त्याबद्दल सांगता येणार नाही. जमीन कोणाची कोणाला दिली, त्या जमिनीचे काय केले त्याबद्दल सरकारने शहानिशा करावी. त्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करीत अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत