“आ र क्ष ण.”

आरक्षण, आरक्षण, आरक्षण,
जो तो उठतो, मागणी करतो,
आरक्षणाचे संरक्षण,
पण विसरून जाती,
जातीयतेच्या भस्मासुराने,
माणसातल्या मानवतेचे,
वर्षानुवर्षे केलेले भक्षण.!
आम्ही माणसं, असूनही माणसापरी,
दिली वागणूक,
जनावरांहून हीन, जगात न्यारी,
ठेऊन कायम, कफल्लक, लाचार,
निरक्षर, दारिद्र्य घरीदारी,
म्हणुन संविधानाने दिली,
सायकल वेगाने दौंडण्याची, आरक्षणाची,
करण्या प्रगती, नाकारलेल्यांची.!
झालीय उन्नती, करून प्रगती,
मिळता अधिकार, आरक्षणाचा,
उंचावलाय स्तर,
थोडा फार जगण्याचा,
फुलतोय हळूहळू,
मळा विस्थापितांचा.!
पाहून बहरत चाललेला,
वेशी बाहेरचा गोतावळा
प्रस्थापितांच्या अडकलाय,
आरक्षणाचा काटा गळा,
असूयेने झालाय रंग, काळा निळा,
म्हणुनच आलाय सगळ्यांना,
आरक्षणाचा उमाळा.!
म्हणुनच आलाय सगळ्यांना,
आरक्षणाचा उमाळा.!!
म्हणुनच आलाय सगळ्यांना,
आरक्षणाचा उमाळा. !!!
अरुण निकम.
9323249487.
मुंबई.
दिनांक…04/09/2025.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत