दिलीप जाधव पाटीलचा नळदुर्ग येथे जाहीर निषेध करत केली अँट्रासिटी अॅक्ट नुसार कडक कारवाईची मागणी

जयभीमवाले आंबेडकरवादी समाजाचे नाव घेत खालच्या पातळीवर जाऊन समाजाला अर्वाच्य भाषेत शिविगाळ करणारा लातूर येथील जातियवादी नराधम दिलीप जाधव पाटील चेरेकर यांचा नळदुर्ग व तुळजापूर येते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षासह, दलित पॅंथर व विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध करून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
याबाबत सविस्तर व्रत असे कि नळदुर्ग पोलीस ठाण्याचे स.पो.नि. स्वप्निल लोखंडे याना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लातूर येथील दिलीप जाधव पाटील चेरेकर यांनी सोशलमिडीयावरून जयभीमवाले आंबेडकरी समाजाचे नाव घेत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आंबेडकरवादी समाजाला व महिलाना केवळ जातिय द्वशभावनेतून अत्यंत अर्वाच्य भाषेत शिविगाळ करून महिलांचा व समाजाचा अवमान केला असून सदर प्रकार हा निंदनीय व निषेधार्थ आहे. आंबेडकरी समाजाला खालच्या पातळीवर जाऊन अर्वाच्य भाषेत शिविगाळ करून समाजा समाजात तेड निर्माण करणाऱ्या जातियवादी नराधम दिलीप जाधव पाटील चेरेकर यांच्यावर अँट्रासिटी अॅक्ट नुसार कडक कारवाई करावी असी मागणी करण्यात आहे. या संदर्भात स.पो.नि. स्वप्निल लोखंडे याना देण्यात आलेल्या निवेदनावर रिपाइं (आठवले) निवेदनावर रिपाइं (आठवले) चे मराठवाडा विभाग कार्यकारिणी सदस्य दुर्वास बनसोडे, जिल्हा समन्वयक एस. के. गायकवाड, अरूण लोखंडे, बाबासाहेब बनसोडे, शाम नागिले दलित पँथर धाराशिव जिल्हा संपर्क प्रमुख , बाशिदभाई कुरेशी, चांगदेव रणे, मधुकर गायकवाड, मारूती खारवे, भिम-आण्णा सामाजिक संघटनेचे जिल्हा संघटक धर्मराज देडे, जिल्हा सचिव सामाजिक प्रशांत धरणे, सामाजिक कार्यकर्ते बाळू देडे, अहेमद शेख सह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. तुळजापूर येथे ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने यासंदर्भात तुळजापूर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले असून जातियदवादी नराधम दिलीप जाधव पाटील चेरेकर यांचा निषेध करून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी असी मागणी करण्यात आली
तुळजापूर पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक याना देण्यात आलेल्या निवेदनावर रिपाइं (आठवले) चे तालुका अध्यक्ष बाबासाहेब मस्के, रिपाई रोजगार आघाडी चे प्रदेश उपाध्यक्ष संजय नाना शितोळे, रमेश गायकवाड, दिलीप मस्के, बलभीम भगत, सुधाकर मस्के, सह कार्यकर्ते यांच्या सह्या आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत