कंत्राटी भरतीवरून सरकारला शरद पवार यांचा प्रश्न.

आरोग्य विभागाचा ढिसाळपणा, बिघडलेली कायदा-सुव्यवस्था, शाळा दत्तक योजनेतील फोलपणा, पोलीस दलासह इतर विभागांत सुरू असलेली बेसुमार कंत्राटी भरती याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी राज्य सरकारला शुक्रवारी धारेवर धरले.
आरोग्य विभागातील ढिसाळपणामुळे राज्यात ठिकठिकाणी मृत्यू होत आहेत. लहान मुले दगावत आहेत. सरकारी दवाखान्यातील पदे भरली नाहीत. आता ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा प्रयत्न होत आहे. अशा पद्धतीने भरती केली जाणार असेल तर आरोग्याचा प्रश्न सुटणार नाही, तो आणखी गंभीर होईल, असा इशारा पवार यांनी दिला. कंत्राटी भरतीचा सपाटा सरकारने लावला आहे. आरोग्य, पोलीस, शैक्षणिक क्षेत्रांत ही भरती केली जात आहे. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. सरकारने चार विभागांत ११ हजार २०३ जागावर कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस भरतीत ११ महिन्यांचे कंत्राट आहे. त्यानंतर ही मुले पुढे काय करणार? असा प्रश्न पवार यांनी केला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत