कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती निर्णयावर शरद पवार यांची राज्यशासनावर टीका.

शिंदे फडणवीस सरकारने मुंबई पोलीसमध्ये कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी ३००० पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयावर शरद पवार यांनी टीका केली आहे.
यावेळी शरद पवार म्हणाले की, आता सरकार कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती करत आहे. याचा चुकीचा परिमाण होऊ शकतो. याचे कारण म्हणजे, आपली नोकरी ही कंत्राटी आहे हे माहित असल्याने लोक बांधिलकी जपत नोकरी करणार नाहीत कारण त्यांना माहित असेल कि आपली नोकरी कंत्राटी आहे कायमस्वरूपी नाही.
याचरोबर शाळा खासगीकरणा विषयी शरद पवार म्हणाले की, आता राज्यातील शाळा या खाजगी कंपन्यांना दत्तक देण्यात येणार आहे. यामुळे खाजगी कंपन्या, खासगी मालक या शाळेमध्ये हस्तक्षेप करणार आणि स्वतःच्या उपयोगासाठी यांचा वापर करणार. गौतमी पाटील हीच नृत्य शाळेत दाखवण्यात आलं हे निंदनीय आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत