नागपुरात १४२ शिक्षक अतिरिक्त; माध्यमिक विभागाकडून यादी जाहीर.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ठरवून दिलेल्या नव्या संचमान्यतेनुसार, पहिली ते पाचवीसाठी ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे नोंदविण्यात आले. सहावी ते आठवीसाठी ३५ तर नववी आणि दहावीसाठी तुकडीनिहाय शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या निकषानुसार त्यापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमधील शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, राज्यातील मराठी, हिंदी आणि उर्दू शाळांची पटसंख्या सातत्याने कमी होत आहे.
त्यातच विद्यार्थ्यांची आधार नोंदणीमध्ये ८० टक्केच विद्यार्थ्याची नोंदणी वैध ठरली. विशेष म्हणजे, त्यामुळे अनेक शाळांमध्ये पटसंख्या कमी झाल्याचे दिसून आले. दुसरीकडे इंग्रजी शाळा वाढल्याने पालकांचा त्याकडे वाढता कल यामुळे शाळांमधील पटसंख्येला फटका बसला. त्यातूनच जिल्हा आणि शहरातील शाळांमध्ये १४२ माध्यमिक शिक्षक अतिरिक्त ठरले आहे. त्याबाबत खासगी अनुदानित आणि अंशत अनुदानित शाळांच्या व्यवस्थापनाने प्रस्ताव पाठविले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत