एका दिवसात विनातिकीट प्रवाशांकडून ८.६६ लाख रुपये दंड वसूल.

पश्चिम रेल्वेपाठोपाठ आता मध्य रेल्वेनेही तिकीट तपासनिसांची फौज स्थानकात तैनात करण्यास सुरूवात केली असून मध्य रेल्वेवरून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. ठाणे रेल्वे स्थानकात सोमवारी सुमारे ३,०९२ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. या प्रवाशांकडून मध्य रेल्वेने ८,६६,४०५ रुपये दंड वसूल केला. भारतीय रेल्वेमध्ये आतापर्यंतची ही एकाच स्थानकातील सर्वात मोठी कारवाई आहे. त्यामुळे नुकताच पश्चिम रेल्वेवरील अंधेरी रेल्वे स्थानकातील विक्रम मध्य रेल्वेने मोडीत काढून नवा विक्रमाची नोंद केली आहे.
मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांमध्ये सीएसएमटीनंतर ठाणे स्थानकाचा क्रमांक लागतो. ठाणे स्थानकातून दररोज ४.७३ लाख प्रवासी येत-जात असतात. मात्र ठाणे स्थानकातून विनातिकीट प्रवाशांची गर्दी वाढल्याने तिकीटधारक प्रवाशांची गैरसोय होत होती. त्यामुळे मध्य रेल्वेने सोमवारी ठाणे स्थानकातील फलाटावर, पादचारी पुलावर, स्थानकाचे प्रवेशद्वार या ठिकाणी तिकीट तपासनीसांची फौज उभी होती. लोकलमधून प्रवासी फलाटावर उतरल्यावर त्वरित त्याचे तिकीट तपासले जात होते. महिला लोकल डब्याजवळ महिला तिकीट तपासनीस उभी होती. यासह पादचारी पुलावर दोन-दोन फुटांच्या अंतरावर एखाद्या तिकीट तपासणी कर्मचारी उभे होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत