आर्थिकमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

भारतात विजेच्या मागणीत वाढ.

या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत म्हणजे एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान, भारताचा वीज वापर सुमारे आठ टक्क्यांनी वाढून सुमारे ८४७ अब्ज युनिट (बिलियन युनिट्स) इतका झाला आहे. देशाच्या आर्थिक उलाढालींमध्ये झालेली वाढ यातून दिसून येते. गेल्या वर्षी याच तिमाहीत हा वापर ७८६ अब्ज युनिट इतका होता.

एप्रिल, मे आणि जून महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम वीज वापरावर झाला. नाहीतर हा वापर दुप्पट झाला असता, असे मत वीज उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. ऑगस्ट महिन्यात आर्द्रतेत वाढ झाल्याने फॅन, कूलर आणि एअर कंडीशनरसारख्या उपकरणांचा वापर वाढला. त्यामुळे विजेची मागणी वाढली, असेही त्यांनी म्हटले आहे. एप्रिल-सप्टेंबर या काळात विजेची मागणी २४१ गिगवॅट इतकी वाढली. ही मागणी मागील वर्षी याच काळात २१५.८८ गिगावॅट इतकी होती.
ऊर्जा मंत्रालयाने उन्हाळ्यात देशातील विजेची मागणी २२९ गिगावॅटवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला होता, पण एप्रिल-जुलैमध्ये अवकाळी पावसामुळे मागणी अपेक्षित पातळीपर्यंत पोहोचली नाही. तथापि, जून महिन्यात विजेची मागणी २२४.१ गिगावॅट तर जुलैमध्ये २०९.०३ गिगावॅट इतकी होती. ऑगस्टमध्ये मागणी २३८.१९ गिगावॅटवर पोहोचली तर सप्टेंबरमध्ये ती २४० गिगावॅटवर पोहोचली.

२०२३ मध्ये उन्हाळ्याच्या दरम्यान, वीज कपातीपासून वाचण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाने अनेक पावले उचलली होती. आयात कोळशावर चालणारे सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता. यासाठी वीज अधिनियम कलम ११ लागू करण्यात आले होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!