बनावट शाळांच्या मुद्दय़ावर गंभीर चर्चा आवश्यक; केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांचे मत.

‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत प्रधान म्हणाले, डमी शाळेच्या मुद्दय़ावर अनेक तज्ज्ञांनी मतप्रदर्शन केलेले आहे. ‘डमी स्कूल’ या सामान्य शाळेसारख्याच शाळा असतात. मात्र या शाळेत जाण्याची गरज नसते. या शाळांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी भरमसाट शूल्क आकारले जाते. मात्र शाळांमध्ये प्रवेश केवळ नावालाच होतो. अशा प्रकारे शाळेत न जाणे विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक वाढीस अडथळा आणते आणि त्यांना अनेकदा एकटेपणा आणि मानसिक तणाव जाणवतो. त्यामुळे या मुद्दय़ावर चर्चा करण्याची गरज असल्याचे मत प्रधान यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांना वर्षांतून दोनदा १० वी आणि १२ वीच्या परीक्षेला बसणे बंधनकारक असणार नाही आणि एकाच संधीच्या भीतीने निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी हा पर्याय आणला जात आहे, असे प्रधान यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईईप्रमाणेच वर्षांतून दोनदा (१०वी व १२वी) परीक्षेला बसण्याचा पर्याय असेल. ते सर्वोत्तम गुण निवडू शकतात. परंतु ते पूर्णपणे वैकल्पिक असेल, कोणतीही सक्ती नाही.
एक वर्ष गमावले, त्यांची संधी गेली किंवा अधिक चांगली कामगिरी करता आली असती या विचाराने विद्यार्थी अनेकदा तणावग्रस्त होतात. एकाच संधीच्या भीतीमुळे निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी हा पर्याय आणला जात आहे,’’ असे प्रधान म्हणाले
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत