‘देशात आणि राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेचा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे. स्थानिक पतळीवरील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य महायुतीला पाठिंबा देत आहेत. लोकसभा निवडणुकीपर्यंत शरद पवार, उद्धव ठाकरे यांना स्वतःचे पक्ष आणि उमेदवार शोधावे लागणार आहेत,’ अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

याच गोष्टी लक्षात घेऊन देशाच्या पुनर्बांधणीमध्ये योगदान देण्यासाठी अजित पवार आणि त्यांना मानणारे राष्ट्रवादीचे नेते सरकारमध्ये सहभागी झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघे गतीने निर्णय घेत आहेत. प्रत्येकाला विकासकामांसाठी निधी मिळत आहे. त्यामुळे स्थानिक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य महायुतीला पाठिंबा देत आहेत.
लोकसभा निवडणुकीपर्यंत जनतेचा हा पाठिंबा नरेंद्र मोदी यांना एवढा वाढेल की उद्धव ठाकरे, शरद पवार यांना आपला पक्ष आणि निवडणुकीसाठी उमेदवारही शोधावा लागेल. भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीला राज्यातून ४५ पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा संकल्प केला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत