ईव्हीएम या यंत्राचा वापर करून सत्ताधारी बनून बहुजनांच्या ऊरावर नाचतं आहेत.

विशालकाय भारत देशात चिमूटभर विद्वेषी वृत्तीचे लोकं धूर्तपणे या बोटावरची थुंकी त्या बोटावर दाखवावी अगदी त्याप्रमाणे इथली सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी ईव्हीएम या यंत्राचा वापर करून सत्ताधारी बनून बहुजनांच्या ऊरावर नाचतं आहेत. धर्मिक क्षेत्रात मंत्राचा वापर करून वर्चस्व तर राजकारणात यंत्राचा वापर करून वर्चस्व गाजवितं आहेत….!!
२००४ पासून गेली २० वर्षे ईव्हीएम या यंत्रावर संशय घेतला गेला अनेक आरोप झाले, सर्वात प्रथम भाजपा या राजकीय पक्षाच्या लालकृष्ण अडवाणी यांनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करुन न्याय मागितला.त्यानंतर भाजपा चेच सुब्रमण्यम स्वामी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करुन न्याय मागितला. मात्र न्याय मिळाला नाही थातूरमातूर मलमपट्टी करुन ईव्हीएम हे भुत भारतीय मतदारांच्या बोकांडी आहे तसेच जीवंत ठेवल्या गेले….!!
त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही उमेदवारांना ०० असे मते नोंदवल्या गेली म्हणून बुलढाणा, अकोला जिल्हा सत्र न्यायालयात केसेस दाखल करुन प्रत्यक्ष उमेदवारांनी माझं स्वतः चं मतं कुठे गेले असा प्रश्न उपस्थित केला आणि न्याय मागितला ऊमेदवाराच स्वतः चं मतं कुठं गेलं हे ना निवडणूक आयोगाने शोधून दिले ना न्यायपालिकेने न्यायाची भुमिका घेऊन त्या प्रश्नाची सोडवणूक केली….!!
००(शुन्य,शुन्य.) अशी मतांची नोंद झाली म्हणजेच मतांची चोरी झाली हे ऊघडं सत्य आहे. मात्र ती मतांची चोरी शोधून देण्याची जबाबदारी असलेले निवडणूक आयोग,आणि देशातील प्रत्येक न्यायप्रिय व्यक्तीचा विश्वास असलेल्या न्याय पालिकेने त्या प्रश्नाचे अद्यापही ऊत्तर दिलेले नाही. ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील ४८ पैकी ३० लोकसभा मतदारसंघात झालेले मतदान आणि मोजलेले मतदान यांच्या मते ३० हजारा पासून तर सव्वा लाख मतांपर्यंत तफावत आहे. ती अधिकची मते आली कोठून? असा प्रश्न विचारतं वंचित बहूजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील मुंबई हायकोर्टात १०.नागपुर खंडपीठात १० आणि औरंगाबाद खंडपीठात १० अशा एकुण हायकोर्टात ३० याचिका दाखल करुन न्याय मागितला.त्या याचिका सुनावणी ला घेतल्याच गेल्या नाहीत म्हणजेच न्याय नाकारला, अशी परिस्थिती आहे….!!
उमेदवार विचारतो माझं स्वतः चं मतं कुठे गेले? त्याचं उत्तर मिळतं नाही. कुणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही.मतांची चोरी होते हे ऊघडं सत्य नाकारुन ईव्हीएम भारतीय मतदारांच्या बोकांडी कशासाठी बसविली जाते. ईव्हीएम च्या संदर्भात निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला की, वाढीव मते आली कोठून तर निवडणूक आयोग उत्तर देतं नाही. न्याय पालिकेत न्याय मागितला तर न्याय नाकारला जातो हे कशासाठी ? ईव्हीएम हे इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे इतर सर्व इलेक्ट्रॉनिक यंत्र हॅक होऊ शकतात मात्र ईव्हीएम हॅक होऊ शकतच नाही हा अट्टाहास कशासाठी ?
संविधानकर्ते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय दूरदृष्टीने संविधानाच्या माध्यमातून शासन,प्रशासनातील काही संस्था या स्वायत्त ठेवल्या त्या संस्थांवर कुणाचाही कंट्रोल नसावा. म्हणजेच त्या संस्थांनी निष्पक्ष कार्य करावे अशी निर्मळ आणि न्यायसंगत त्याची भुमिका होती. आपल्या संविधानाने ज्या स्वायत्त संस्था म्हणून ठेवल्या आहेत त्यामध्ये निवडणूक आयोग आणि न्याय पालिका आहे…!!
निवडणूक आयोग आणि न्याय पालिकेने आपापली स्वायत्तता लक्षात घेऊन ईव्हीएम कडे बघितले असते तर माझं मत कुठे गेले.?या प्रश्नाचे उत्तर मिळाले असते.मतांची हेराफेरी शोधतां आली असती. झालेले मतदान आणि मोजलेले मतदान यांच्या मधील तफावत चटकन शोधून काढता आली असती. ईव्हीएम च्या दणक्याला बळी पडलेले बहूतेक प्रादेशिक राजकीय पक्ष, बळी ठरलेले राजकीय नेते, राजकीय करिअर उध्वस्त झालेले उमेदवार,आणि न्यायप्रिय मतदार या सर्वांनी ईव्हीएम नावाच्या आधुनिक विष्णू अवतारा बद्दल संशय व्यक्त केला, आरोप दाखल केले. न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला.मात्र न्याय दिला जात नाही हा २० वर्षाचा अनुभव लक्षात घेऊन. आधुनिक विष्णू च्या अवतार संपवण्यासाठी पुढील रणनीती ठरविली पाहिजे….!!
आधुनिक विष्णू चा ईव्हीएम अवतार हा सांसदीय लोकशाही संपवण्यासाठी मुठभर सवर्णांनी तयार केला आहे. त्याचे कारण असे की, “एक मतं एक मुल्य” या नियमानुसार मुठभर संख्या असलेले सवर्ण शासनकर्ते होऊच शकत नाहीत. एक मतं एक मुल्य या नियमामुळे बहूजन समुहचं सतत सत्तेत राहू शकतो आणि बहूजनांचे राज्य निर्माण होऊ शकते. सांसदीय लोकशाही असतांना आणि एक मतं एक मुल्य हा नियम असतांना सुद्धा विद्वेषी वृत्तीचे सवर्ण लोकं चिमुटभर असुनही सत्ताधारी आणि तुम्ही बहूसंख्य असुनही जाचक ही भावना तुमच्या मनात उत्पन्न होतं नाही का ? आपली संख्या बहू असुनही आम्ही याचक कसे? आणि का ? हा प्रश्न तुमच्या मनाला सतावतं नाही का ? ईव्हीएम या यंत्राचा वापर करून भारतीय बहूजन समूहाला गुलाम बनविण्याचा प्रयत्न केला जातो आहे…!!
“ज्यांना इतिहासाचे विस्मरण होते ते इतिहास घडवू शकतं नाहीत.” असे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात….!!”
आपला इंग्रजांच्या गुलामीचा काळ आठवला तर असे लक्षात येते की, इंग्रजाच्या हातात अमर्याद सत्ता होती. पोलीस प्रशासन दिमतीला होते. न्याय पालिकेवर कब्जा होता धाक दाखवण्यासाठी हातात शस्त्रसज्ज सैनिक होते. जालियनवाला बाग हत्याकांड घडवून भारतीय जनतेला इंग्रजांनी धाकही दाखविला होता. तरीही स्वातंत्र्यासाठी मनाने तयार झालेला भारतीय नागरिक असहकार, परदेशी मालावर बहिष्कार असे आंदोलने करून इंग्रजांना हतबल करीत होता. ईव्हीएम नावाच्या भुताला गाडायचे असेल तर कोणत्याही सवर्णांचे प्रमुख असलेले प्रस्थापित राजकीय पक्षांच्या भरवशावर राहता येणार नाही. सवर्ण, सवर्णांच्या विरोधातील लढाई कधीच लढतं नाही. बहुजनांनी एकत्र येऊन आपल्या स्वतःच्या सत्तेसाठी, सांसदीय लोकशाही वाचविण्यासाठी ईव्हीएम विरोधात जनआंदोलन ऊभे करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे…!!
रस्त्यावरची लढाई लढावी लागेल. ईव्हीएम बहिष्कार आंदोलन करावे लागेल. जनरेटा ऊभा करावा लागेल. बहुजनांची लढाई, बहूजनाला लढावी लागेल. सवर्ण कशाला या लढ्यात सामील होईल.??
बहुजन बांधवांनो तुमच्या पुढच्या पिढीचा विचार करा. सत्तेवाचून तुमची पुढची पिढी सुरक्षित राहिल का ?
म्हणून मती सुधार गती वाढवं आणि कर्म करण्यास सज्ज हो.
: भास्कर भोजने
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत