नांदेडमध्ये 62 मृत्यू; सलग पाचव्या दिवशीही नांदेडच्या रुग्णालयात 11 रुग्णांचा मृत्यू.

नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ३० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या २४ तासांत तब्बल २४ रुग्णांचे मृत्यू झाले होते. यात १२ नवजातमुंबई अर्भकांचाही समावेश होता. हे प्रकरण राज्यभर गाजले. तेव्हापासून ५ ऑक्टोबरपर्यंत या रुग्णालयात रुग्णांचे मृत्युचक्र सुरूच आहे. या सहा दिवसांत तब्बल ६२ रुग्णांचे प्राण गेले. याबाबत टीकेची झोड उठली तरी राज्य सरकार मात्र चूक मान्य करायला तयार नव्हते. आरोग्य संचालकांनी तीन सदस्यांची समिती नेमून चौकशी केली. त्यातही अपेक्षेप्रमाणे रुग्णालय प्रशासनाला क्लीन चिट दिली. गंभीर अवस्थेत दाखल झालेले रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत नसल्यानेच त्यांचा मृत्यू झाला, असा निष्कर्ष या समितीने काढला आहे. त्यामुळे ६२ मृत्यूला कुणीच जबाबदार नाही का, असा सवाल मृतांचे नातेवाईक करत आहेत. कुरुळा (ता. कंधार) येथील मायलेकीच्या मृत्युप्रकरणी या रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. श्यामराव वाकोडे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र सरकारी अहवालाच्या आधारे त्यांच्यावरही कारवाईची शक्यता कमीच आहे. दरम्यान, ५ ऑक्टोबर रोज दिवसभरात आणखी ११ अतिगंभीर रुग्णांचा मृत्यू झाला. यात तीन नवजात बालकांचा समावेश आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत