अजित पवार गटाकडून खोटी कागदपत्रे सादर करण्यात आल्याचा शरद पवार यांचा दावा ;राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह कुणाचं? पुढील सुनावणी सोमवारी.

राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची… या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगात शुक्रवारी दोन तास सुनावणी झाली. स्वत: शरद पवार या वेळी उपस्थित होते. अजित पवार गटाकडून खोटी कागदपत्रे सादर करण्यात आल्याचा दावा शरद पवार गटाने केला. तर पक्षाचे सर्वाधिक आमदार व पदाधिकारी आमच्याकडे असल्याने पक्ष आमचाच, असा दावा अजित पवार गटाने केला आहे. आयोगाने पुढील सुनावणी सोमवारी ठेवली आहे.
अजित पवार गटाचा दावा, पवारांची निवडच बेकायदा
विधानसभेचे ४२ व विधान परिषदेचे ६ आमदार, नागालँडमधील ७ आमदार, लोकसभा आणि राज्यसभेचे प्रत्येकी एक खासदार आमच्यासोबत आहेत. अजित पवार यांची ३० जूनला अध्यक्षपदी निवड झाली. पक्षाचे मुख्य प्रतोद अनिल पाटील आमच्याबरोबर आहेत. विधानसभा, विधान परिषदेचे अधिक संख्याबळ आमच्याकडे आहे. कोअर कमिटीतील सदस्यही आमच्याबरोबर आहेत. अनेक वर्षांपासून पक्षांर्तगत निवडणुका झाल्या नाहीत. शरद पवारांची निवडच बेकायदा अाहे.
शरद पवार गटाचा दावा, २४ प्रदेशाध्यक्ष आमचे
राष्ट्रवादी पक्ष कुणाचा हे देशात सर्वांना माहिती आहे. अजित पवार गट पक्षापेक्षा वेगळी भूमिका घेऊन बाहेर पडला. २४ राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा शरद पवारांना पाठिंबा आहे. त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड पक्ष घटनेला धरून आहे. त्यामुळे आयोगाने आमची बाजू एेकून घेतल्याशिवाय निर्णय घेऊ नये. चिन्ह गोठवू नये. मृत व्यक्तींची कागदपत्रे अजित पवार गटाकडून सादर करण्यात आली. खोटी कागदपत्रे सादर करून अजित पवार गटाकडून पक्षावर दावा करण्यात येत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत