आणि शहा संतापले..!

“इंडिया टुडे कॅानक्लेव्ह” या कार्यक्रमात राहुल कनवाल यांनी विचारलेल्या प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची चांगलीच पंचाईत झाली. कांहीच समाधानकारक सांगता येत नसल्याने त्यांचा संताप स्पष्ट दिसत होता.
इलेक्टोरल बॉण्ड प्रकरणावरुन देशातील राजकारण तापलेलं असतानाच या माध्यमातून सर्वाधिक देणगी मिळालेल्या भारतीय जनता पार्टीला विरोधकांनी लक्ष्य केलं आहे. मात्र या प्रकरणार आता थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया नोंदवत पक्षाची बाजू मांडली आहे.
काळा पैसा नष्ट करण्यासाठी इलेक्टोरल बॉण्डची योजना अमलात आणली होती. मात्र ही योजनाच रद्द झाल्याने काळ्या पैशाचा पुन्हा वापर केला जाईल, अशी भीती अमित शाहांनी व्यक्त केली आहे.
अनेक मोठ्या उद्योजक घराण्यांची नावं देणगीदारांमध्ये नाही ज्यांच्या नावाने देशात राजकारण होतं. त्यांनी भाजपाला देणगी दिली नाही का? असा प्रश्न अमित शाहांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अमित शाहांनी, “स्वातंत्र्यानंतर उद्योजकांनी राजकीय पक्षांना देणगी दिलीच नाही का? त्यांच्या नावांची तरी घोषणा झाली का कधी? आता बॉण्ड्समुळे नावं तरी समोर आली आहेत. हे लोक काय गोपनियतेबद्दल बोलता. कोट्यवधी रुपयांची रक्कम रोख देणगी म्हणून घेतली. 12 लाख कोटींचे घोटाळे, भ्रष्टाचार केले. तुरुंगात जात आहेत आणि आमच्याकडे हिशोब मागताय?” असं म्हणत अमित शाह संतापले. एका पक्षाला देणगी दिल्यानंतर दुसरा पक्ष त्रास देईल अशी भीती देणगीदारांना असल्याने त्यांची नावं गुप्त ठेवण्यात आल्याचा दावा अमित शाहांनी केला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत