मार्गशीर्ष पौर्णिमा

*मार्गशीर्ष पौर्णिमेला पाली भाषेत ‘मागसीरो मासो’म्हणतात. ही पौर्णिमा साधारणतःडिसेंबर महिन्यात येते.
या पौर्णिमेच्या महत्वपूर्ण घटना-
▪️ वेळूवन दान ▪️
या पौर्णिमेला संबोधी प्राप्ती नंतर भगवान बुध्द सर्व प्रथम राजगृहला आले असता बिंबीसार राजाने वेळूवन भिक्खू संघाला दान केले .
▪️ भिक्खुनी संघ स्थापना ▪️
माता महाप्रजापति गौतमी आणि त्यांच्या सोबतच्या ३०० स्रियांचा संघात प्रवेश , ( भिक्खूनी संघाची स्थापना करण्यासाठी तथागतास विनवणी ….)
▪️ नालगिरी हत्तीवर विजय▪️
अत्यंत भयानक अशा नालगिरी हत्तीला आपल्या मैत्रीबलाने जिंकले.
▪️श्रीलंकेत भिक्खुणी संघ स्थापना▪️
या पौर्णिमेच्या दिवशी चक्रवर्ती महान सम्राट अशोक यांची मुलगी माता संघमित्रा यांनी श्रीलंकन भिक्खूणी संघाची स्थापना केली.
▪️ भंते सुमन ▪️
माता संघमित्रा ह्या संघामध्ये येण्याच्या आगोदर त्या विवाहित होत्या व त्यांना सुमन नावाचा एक मुलगा होता. आपल्या वडिलांच्या(सम्राट अशोक) यांच्या सूचनेवरून त्या वयाच्या १९ व्या वर्षी भिक्खूणी झाल्या त्यांच्या मुलगा ही श्रामणेर झाला व पुढे अर्हन्त पदाला पोहोचला.
▪️ श्रीलंकेत बोधिवृक्ष स्थापना▪️
याच पौर्णिमेच्या दिवशी बोधगया येथील बोधिवृक्षाची फांदी श्रीलंकेतील अनुराधापूर येथे भिक्खूणी संघमित्रा यांच्या हस्ते लावली गेली. आजही अनुराधापूर येथे त्या फांदीपासून निर्माण झालेला वृक्ष उभा आहे. हा बोधिवृक्ष सिद्धार्थ गौतम बुद्धाने दुःख मुक्तीसाठी सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाचे पालन करण्यासाठी सर्व लोकांमध्ये उत्साह निर्माण करण्याचे महान कार्य करीत आहे.
▪️▪️▪️
अशा या मार्गशीर्ष पोर्णिमेच्या सर्वांच्या प्रति खूप खूप मंगल कामना. 🌹🌹🌹
🔹 शुभेच्छुक 🔹
▪️ आयु. प्रशांत चव्हाण सर.
माजी तालुकाध्यक्ष
भारतीय बौद्ध महासभा
श्रीगोंदा तालुका.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत