नागपूर येथे EVM मध्ये बिघाड; पहिल्याच घासाला खडा, मतदारांच्या मनात शंका

नागपूर : लोकसभा 2024 च्या रणधुमाळी मध्ये निवडणूक आयोगाकडे वारंवार तक्रार करूनही प्रत्येक वेळी क्लीन चिट भेटलेल्या EVM मशीन ने समर्थन करणाऱ्या सर्वांना तोंडावर पाडले आहे. नागपूरमधील दिघोरी येथील जयमाता प्रा. शाळा मतदान केंद्रावर एका ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे.
मतदान केंद्रावर मतदारांची बाहेर रांग लागलेली असताना तब्बल 1 तास 10 मिनिटे मतदान उशिराने सुरू झाले. यावेळी मतदान केंद्रावर मोठ्याप्रमाणात गर्दी झाली होती.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ईव्हीएममध्ये बिघाड आल्याने पूर्ण युनिट बदलण्यात आले. जयमाता प्रा. शाळा मतदान केंद्रावर Booth no.246 येथील ईव्हीएम मशीन बदलण्यात आलं. पहिल्याच दिवशी अशी समस्या आल्याने पुन्हा एकदा ईव्हीएम मशीन वरून नागरिकांच्या मनात शंका उपस्थित होत आहे.
नागपूरमध्ये महायुतीकडून भाजपचे नितीन गडकरी आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यात थेट लढत सुरू होत आहे. त्यामुळे आता गडकरी नागपुरात हॅट्रिक मारणार की विकास ठाकरे विकासरथ आपल्या हाती घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत