अण्णा हजारे यांनी केले देशाचे वाटोळे जितेंद्र आव्हाड.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियात केलेली पोस्ट त्यासाठी कारण ठरली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारे यांचा एक फोटो ट्वीट केला आहे. त्यासोबत त्यांनी अण्णा हजारे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ‘या माणसानं देशाचं वाटोळं केलं. टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही, असं आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
युती सरकारच्या काळात राज्यातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आंदोलन केल्यामुळं अण्णा हजारे सर्वप्रथम खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आले होते. त्यांच्यामुळं काही मंत्र्यांना तुरुंगातही जावं लागलं. राळेगणसिद्धी इथल्या ग्रामविकासामुळंही महाराष्ट्रात त्यांचं नाव झालं.
दिल्लीतील रामलीला मैदानावर मनमोहन सिंग सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात केलेल्या आंदोलनामुळं राष्ट्रीय पातळीवर त्यांना ओळख मिळाली. सदरा पंचा घालणारे व डोक्यात टोपी घालणाऱ्या हजारे यांच्यात अनेकांना गांधीजी दिसू लागले. या आंदोलनामुळं तत्कालीन यूपीए सरकारच्या विरोधात जनमत बनविण्यास मोठी मदत झाली होती. केंद्रातील काँग्रेस सरकार जाण्यास ते आंदोलन बऱ्याच अंशी कारणाभूत ठरलं होतं.
सत्तांतर झाल्यानंतर मात्र अण्णा हजारे हे फारसे कुठल्याही आंदोलनात दिसले नाहीत. देशात आणि राज्यात अनेक प्रश्न असताना त्यांनी मोठं आंदोलन करणं टाळलं. त्यांचा विरोध पत्रव्यवहारापुरता मर्यादित होता. त्यामुळं ते भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप झाला. अण्णा हजारे यांनी त्यास उत्तरही दिलं होतं. मात्र, त्यांच्यावरील टीका थांबली नाही. राज्यात किंवा देशात कुठलीही मोठी घटना घडली की विरोधक खोचक पद्धतीनं अण्णा हजारे यांना आंदोलनासाठी आवाहन करतात.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत