५० हजार रुपये एकरप्रमाणे भरपाई द्यावी बहुजन समाज पार्टी उमरेडतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर.
कुही तालुक्यात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने सोयाबीन, मिरची पिकांची नासाडी केली. त्यामुळे सरकारने एकरी ५० हजार रुपयांची सरसकट त्वरित नुकसान भरपाई द्यावे, या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथजी शिंद यांना तहसीलदार शरद काबंळे यांच्या माध्यमाने बहुजन समाज पार्टी उमरेड तालुक्याच्या वतीने देण्यात आले.
त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने शिक्षण विभागामार्फत कंत्राटी पद्धतीने पदभरती थांबवून जिल्हा परिषद शाळेचे खाजगीकरण रद्द करावे बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने जाती निहाय जनगणना करण्यात यावी आणि महाराष्ट्र शासनाने शिक्षण विभागामार्फत कंत्राटी पद्धतीने पदभरती थांबवून जिल्हा परिषद शाळेचे खाजगीकरण रद्द करावे या शयाच्या मागण्याही या निवेदनात करण्यात आल्या. शासनाने या मागण्यांसंदर्भात १० दिवसाच्या आत दखल न घेतल्यास बहुजन समाज पार्टी कुहीच्या वतीने जनआंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला. कुही तालुका बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष शुभम खोब्रागडे यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी पं. स. सदस्य देविदास गवळी, सूरज तांबे व कार्यकर्ते उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत