
पंजाबमधील काँग्रेस आमदार सुखपाल सिंह खैरा यांच्या अटकेनंतर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये पुन्हा एकदा खडाजंगी पाहायला मिळत आहे. पंजाब काँग्रेसचे नेते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर जोरदार निशाणा साधत आहेत. दोन्ही पक्षांमधील या भांडणाचा परिणाम विरोधी पक्षांच्या INDIA आघाडीवरही दिसू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही आमदार सुखपाल सिंह खैरा यांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आमदार सुखपाल सिंह खैरा यांच्या अटकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. या घटनेची पूर्ण माहिती अद्याप मिळालेली नसल्याचे खरगे यांनी सांगितले.खरगे पुढे म्हणाले की, कोणावर अन्याय झाला तर तो फार काळ टिकत नाही. आमच्यावर कोणी अन्याय केला तर तो सहन करणारे आम्ही नाहीत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत