आयु.शिवदास जी म्हसदे सर यांची” मानव कल्याण बहु उद्देशिय सामजिक संस्था नासिक तर्फे संविधान मूल्य जागृती समाज भूषण” पुरस्कार

मानवतावादी बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष , मा. से.नी.केंद्र प्रमुख जिल्हा परिषद नासिक, आंबेडकरी चळवळीतील अग्रगण्य नेतृत्व, तसेच भारतीय संविधानाचे महत्व सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचविण्यासाठी कायम धडपड करणारे तसेच व्याख्यान आयोजित करून व्याख्याणाच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीला सक्रिय करण्यात,नासिक शहरात सर्वात मोठा वाटा उचलणारे आदरणीय आयु.शिवदास जी म्हसदे सर यांची” मानव कल्याण बहु उद्देशिय सामजिक संस्था नासिक तर्फे संविधान मूल्य जागृती समाज भूषण”
पुरस्कारासाठी निवड झालेली आहे, सदरचा* संविधान मूल्य जागृती समाज भूषण *पुरस्कार वितरण, दिनांक १५/६/२०२५ रोजी सकाळी ११/३० वाजता मु. श.औरंगाबादकर सभागृह प. सां.नाट्यगृह शेजारी नासिक येथे प्रदान करण्यात येणार असल्याचे ,मानव कल्याण सामाजिक संस्थेचे ,संस्थापक अध्यक्ष माननीय आयु. टी. वाय. जाधव मा.गट विकास अधिकारी साहेब यांनी जाहीर केले आहे, सदरचा पुरस्कार आयु.आदरणीय शिवदास जी म्हसदे सर यांना जाहीर झाल्यामुळे ,आमच्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना देखील खऱ्या अर्थानं एकीचं आणि अशाच प्रकारे सामाजिक उत्थानाच बळ मिळतं,आणि तितकच खरं देखील आहे, आदरणीय आयु शिवदास जी म्हसदे सरांचे सामाजिक कार्य अतिशय उतुंग भरारी घेणारे तसेच आंबेडकरी समाजाभिमुख आहे, हे नाकारून चालणार नाही, त्यांनी संविधान जागृती साठी अथक परिश्रम घेवून आजतागायत असंख्य व्याख्याने आयोजित केले आहेत, स्वतः पदरमोड खर्च करून स्वताला झोकून दिलेले मी स्वतः अनुभवले आहे ,ते मानवतावादी बहु उद्देशिय संस्था नाशिक चे संस्थापक अध्यक्ष देखील आहेत, आदरणीय आयु.शिवदास जी म्हसदे सर यांची *संविधान मूल्य जागृती सामाजभूषण* पुरस्कारासाठी योग्य व्यक्ती समजून केलेली निवड सार्थ आहे असे मला वाटते, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय टी.वाय जाधव साहेब से.नी.मा. गट विकास अधिकारी यांनी केलेली निवड आदरणीय शिवदास जी म्हसदे सर यांना आणखी पुढे कार्य करण्याचे बळ देवून जातं, आयु.शिवदास जी म्हसदे सर यांचे सामाजिक कार्य असेच अविरत ठेवून सार्थ ठरवतील याची मला निश्चितच खात्री आहे. आदरणीय शिवदास जी म्हासदे सर हे देखील आदरणीय आयुष्यमान आर.आर.जगताप दादा, आदरणीय आयु. टी.वाय. जाधव साहेब व काही निवडक सहकारी बरोबर घेवून धम्मज्योती विशेष अंक दरवर्षी प्रकाशित करून समाज प्रबोधन चे कार्य अविरत करीत असतात त्यामुळे आंबेडकरी समाजा प्रती असलेली त्यांची आस्था,आणि त्यांनी केलेलं अविरत कार्याची, मानव कल्याण बाउद्देशिय संस्था नासिक यांनी दखल घेतल्याने संविधान मूल्य जागृती समाज भूषण *पुरस्कारासाठी आयु.म्हसदे सरांची निवड सार्थ आहे असे मला मनोमन वाटते, त्यामुळे मला देखील आयु.शिवदास जी म्हसदे सरांचे कौतूक करण्याचा मोह आवरला गेला नाही,,त्यामुळे य पोस्टच्या नीमित्ताने आदरणीय आयु.शिवदासजी म्हसदे सर जी!!आपले मनापासून खूप-खूप हार्दिक -हार्दिक अभिनंदन! अभिनंदन!!अभिनंदन!!! आदरणीय शिवदास जी म्हसदे सर जी,आपल्या पुढील भावी वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा!! अशीच उत्तरोत्तर प्रगती आपली होत राहो, अशी मी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या कडे धम्म याचना करतो, आणि पुनश्च आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो🙏🙏🌹🌹
आयु. रमेश जगताप, से. नी.स.लेखाधिकारी तथा कार्याध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ नासिक विभाग नासिक
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत