भारतीय बौद्ध महासभेत कार्यकर्ता हे पद मोठे आहे – ऍड. डॉ. एस के भंडारे


नाशिक जिल्हा महिला कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न
नाशिक:भारतीय बौद्ध महासभा ही बौद्धांची मातृ संस्था आहे व त्याच संस्थेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 /10/1956 रोजी पाच लाख जनतेला धम्म दिक्षा दिली. त्यामुळे आपण पदाधिकारी हे मातृत्व भावनेने काम करून संविधान समर्थक समाज जोडण्यासाठी मिशन 25 राबावावे लागेल आणि पदे मोठे न समजता काम मोठे पाहिजे तसेच भारतीय बौद्ध महासभेत कार्यकर्ता पद मोठे आहे. संस्थेत पदाधिकारी यांना वरिष्ठाच्या मर्यादेत काम करायचे असते मात्र वरिष्ठ सामान्य कार्यकर्ताचे मत / म्हणणे ऐकतात असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी /राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय कार्यालय प्रमुख ऍड डॉ एस के भंडारे यांनी महाउपासिका मीराताई आंबेडकर भवन जिल्हा कार्यालय,जेल रोड नाशिक येथे दिनांक 25/10/2026 रोजी भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा पश्चिम महिला कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात केले. या शिबिराचे आणि दोन्ही जिल्हा शाखेच्या ( पुरुष व महिला ) बोर्डाचे व वर्षावास समाप्ती निमित्त कार्यालयाच्या बाहेर बोधी वृक्षाचे रोपण ऍड डॉ एस के भंडारे यांच्या हस्ते करण्यात आले. ऍड भंडारे यांनी कार्यालयीन कामकाज व हिशोब आणि पदाधिकारी यांची जबादारी विषयावर मार्गदर्धन केले व आयुनी. स्वातीताई गायकवाड (महाराष्ट्र राज्य संस्कार उपाध्यक्ष)यांनी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे उद्धिस्ट व मिशन आणि कार्यकर्ता व प्रबोधनाची आचारसंहिता या विषयावर मार्गदर्धन केले.
सकाळी समता सैनिक दलाचे जिल्हा प्रमुख मेजर जनरल एकनाथ भालेराव व समता सैनिक च्या पूर्ण टीमने ऍड एस के भंडारे यांना जनरल सलामी देऊन स्वागत केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानीआयुनि.वनिताताई प्रकाशकुमार
मोरे,( अध्यक्षा, नाशिक पश्चिम महिला जिल्हा शाखा ) होत्या व सूत्रसंचालन आयुनि.सत्यभामा राव (जिल्हा सरचिटणीस ) यांनी केले या शिबिरात आयु कृष्णाजी सोनवणे (अध्यक्ष पश्चिम जिल्हा ) आयु शरद एल भोगे (सरचिटणीस, पश्चिम जिल्हा ) आयु, रितेश गांगुर्डे ( कोषाध्यक्ष पश्चिम जिल्हा )यांनी
कार्यकर्ता शिबिर राबवण्यासाठी खूप मोठे योगदान दिले
ऍड एस के भंडारे यांनी कार्यकर्ता शिक्षण शिबिराविषयी सुंदर प्रकारे समजावला व हिशोब कसा करायचा त्या बाबत कौटुंबिक उदाहरणे देऊन अत्यंत साध्या शब्दात समजावून सांगितला
आयुनी सुरेखाताई बर्वे यांनी वंदना (त्रिशरणं पंचशील) घेतले,आयु नि सुरेखाताई लोखंडे( उपाध्यक्ष पर्यटक ) यांनी आभार मानले .भारतीय बौद्ध महासभा नासिक जिल्हा पश्चिम महिला/ पुरुष अंतर्गत तालुका शहर शाखा,समता सैनिक/ बौद्धाचार्य/ बौद्धाचार्य / केंद्रीय शिक्षक/केंद्रीय शिक्षिकाधम्म उपासिका/ धम्म उपासक आणि सर्वच पदाधिकाऱी
यांनी प्रमुख उपस्थिती देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत



