आरोग्यविषयकदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपान

महाराष्ट्र क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट्स विधेयक रुग्ण हक्कांचा बळी देणारे, दरपत्रक लावल्याने रुग्ण हक्क कसे जपणार?- राजेंद्र पातोडे

महाराष्ट्र सरकारने आणलेले ‘महाराष्ट्र क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट्सनोंदणी व नियमन विधेयक, २०२६’ हे रुग्णांच्या हितासाठी नसून खासगी हॉस्पिटल्सच्या नफेखोरीला मोकळे रान देणारे आहे. सर्वोच्च न्यायालयाने विविध निकालांद्वारे स्पष्टपणे बजावले आहे की, ‘घटनेच्या कलम २१ नुसार मिळणारा जगण्याचा अधिकार म्हणजे वेळेत, रास्त आणि सन्मानजनक वैद्यकीय उपचार मिळणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे.’ तसेच, पैसे भरले नाहीत म्हणून मृतदेह रोखून धरणे किंवा रुग्णाला ओलीस ठेवणे हे बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने वेळोवेळी स्पष्ट केले आहे. मात्र, महायुती सरकारने या विधेयकातून सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, रुग्णांचे मूलभूत हक्क आणि तक्रार निवारण यंत्रणाच धाब्यावर बसवली आहे. रुग्णांच्या आरोग्याचा हक्क हिरावून घेणारा हा नवा कायदा म्हणजे जनतेच्या पाठीत खंजीर उपसण्याचाच प्रकार आहे.नुसते दरपत्रक लावल्याने रुग्ण हक्क कसे जपणार ह्याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी घेतली आहे.

या विधेयकात रुग्णांच्या विरोधात जाणारे आणि खासगी हॉस्पिटल्सचे भले करणारे अनेक गंभीर दोष आहेत. पूर्ववत लागू असलेल्या महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन नियमावली २०२१ मध्ये रुग्णांना दिलेले अनेक महत्त्वाचे हक्क नव्या मसुद्यात थेट वगळण्यात आले आहेत.यात बिल न भरल्यास रुग्णाला किंवा मृतदेहाला रोखून ठेवण्याविरोधातील स्पष्ट संरक्षण काढण्यात आले आहे.तसेच रुग्णांच्या तक्रारींचे २४ तासांत निवारण करणारी जिल्हास्तरीय व स्थानिक तक्रार निवारण यंत्रणा आणि टोल-फ्री हेल्पलाइन रद्द करण्याचा प्रस्ताव आहे. उपचाराच्या खर्चावर, अवाजवी बिलांवर किंवा औषध-वैद्यकीय साहित्यातील नफेखोरीवर कोणतीही मर्यादा यात घातलेली नाही.अनिवार्य मानके व प्रमाणित उपचार पद्धती बंधनकारक न केल्यामुळे रुग्णांची आर्थिक लूट आणि अनावश्यक चाचण्यांचे प्रमाण वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

वंचित बहुजन आघाडी या जनविरोधी आणि रुग्णविरोधी विधेयकाचा तीव्र निषेध करत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून या विधेयकात त्वरित सुधारणा करण्यात याव्यात; उपचारांच्या दरांवर मर्यादा घालावी, स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा उभारावी आणि राष्ट्रीय रुग्ण हक्क सनदेतील सर्व हक्क समाविष्ट करावेत. जर सरकारने सर्वसामान्यांच्या आरोग्याचा खेळ मांडणारा हा कायदा असाच लादण्याचा प्रयत्न केला, तर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून रुग्णांच्या हक्कासाठी आंदोलन करणार असल्याचे देखील वंचितने जाहीर केले आहे.

राजेंद्र पातोडे
प्रदेशाध्यक्ष,
वंचित बहुजन आघाडी

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!