पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता केली जप्त.

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने मोठी कारवाई केली आहे. केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाकडून कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. जीएसटी विभागाने एप्रिल महिन्यातही कारखान्यावर छापेमारीची कारवाई केली होती.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने 6 महिन्यांपूर्वी छापेमारी करून काही कागदपत्रे तपासले होते. यामध्ये या कारखान्याने 19 कोटी रुपयांचा बेकायदेशीर जीएसटी कर बुडवल्याचे स्पष्ट झाले आहे.
काल त्यानंतर औरंगाबाद येथील जीएसटी आयुक्तालयाने या कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या कारखान्याच्या चेअरमन पंकजा मुंडे आहेत.
दरम्यान केंद्र सरकारचा जीएसटी थकवल्याप्रकरणी वैद्यनाथ साखर कारखान्याची चौकशी सुरु होती. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला शनिवारी यासंदर्भात नोटीस बजावण्यात आलेली होती. तर कारखान्यातील कोणती मालमत्ता जप्त केली आहे याची माहिती असलेले एक पत्रक जीएसटी विभागाकडून कारखान्याच्या गेटवर लावण्यात आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत