दि.24सप्टेंबर1932 पुणे करार दिन.

पुणे करारा मध्ये असे काय होते की त्यामुळे गांधीला अमरण उपोषणाला बसावे लागले.
स्वतंत्र मतदार संघ SC,ST,OBC आणि Minority च्या मेदवाराला मत देण्याचा आधिकार फक्त SC,ST,OBC आणि minority च्या लोकांनाच राहील. दुहेरी मतदान (दोन वेळा) मत देण्याचा आधिकार SC,ST,OBC आणि minority च्याउमेद्वाराला त्यांच्या लोकांकडून आपला प्रतिनिधी निवडून आणण्याचा आधिकार राहील.उदा : एखाद्या विभागातुन SC चा उमेदवार उभा असेल तर त्याला SC कास्टचेच लोक मतदान करु शकतात ST,OBC minority, च्या उमेद्वाराला त्यांचेच लोक मतदान करतील. प्रोढ़ मताधिकार २१ वर्षे पूर्ण असलेल्या व्यक्तिलाच मतदानाचा आधिकार असेल. इंग्लंड च्या पार्लमेंट मध्ये मतदान कोणी करावे याच्यावर चर्चा सुरु होती या चर्चेचे डॉ, आंबेडकरांना ही निमंत्रण होते.त्या चर्चेसाठी बाबासाहेबांना बोलावण्यात आले.इंग्रजांनी मुद्दा मांडला की जे लोक income tax भरत असतील तेच वोट करतील. त्यांचा मुद्दा बाबासाहेबांनी मोठ्या शिताफीने खोडला. ते म्हणाले की भारतीय लोक अशिक्षित आणि गरीब आहेत. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची संपत्ती नाही त्या मुळे income tax भरण्याचा प्रश्नच येत नाही. आणि भारतात शिक्षण आणि संपत्ती साठविण्याचा आधिकार फक्त ब्राम्हन लोकांनाच आहे. त्या मुळे असा कायदा पास झाला तर सर्व आधिकार आणि निर्णय हे ब्राम्हनच घेतील.आणि आमचे लोक आधिकारापासून वंचीत रहातील. त्या पेक्षा वोट देण्याचा आधिकार हा २१ वर्षे पूर्ण असलेल्या व्यक्तिलाच मिळावा. पर्याप्त प्रतिनिधित्व स्वतंत्र मतदार संघामध्ये SC,ST,OBC आणि minority यांच्या मधून लोकसंखेच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व मिळणार होते.पण ह्याच पुणे करारा मुळे संयुक्त मतदार संघ लागू झाला. आणि आज पर्यंत लोकसंख्येच्या प्रमाणातप्रतिनिधी मिळाले नाहीत. १९५२ च्या निवडनुकीत पंडीत जवाहरलाल नेहरुनी ६०% ब्राम्हनांना टिकिट देऊन ५६% ब्राम्हण निवडून आणले.आणि स्वतंत्र भारतात पुन्हा एकदा ब्राम्हणशाही प्रस्थापित झाली.आणि पुन्हा वर्चस्व ब्राम्हनांचेच स्थापन झाले आणि जेंव्हा हे चार आधिकार इंग्रजांकडून मिळवुन घेतले तेंव्हा गांधीनी बाबासाहेबां विरोधात अमरण उपोषनाचे हत्यार उपसले, कारण की गांधीनी ओळखले होते की या आधिकारांमुळे संसदेत खरे प्रतिनिधी निवडून जातील. आणि असे झाले तर ब्राम्हनाला देखील SC,ST,OBC आणि Minority च्या मतांवर आवलंबुन रहावे लागेल.भारतात obc ची संख्या सर्वात जास्त ५२% आहे, त्या खालोखाल minority १८% आणि sc ची १५% आणि st ची ८% व् त्या खालोखाल फक्त ३% ब्राम्हणाची असेल, त्यामुळे आपोआप बाकी समाजाचे प्रतिनिधी जास्त निवडून जातील व ब्राम्हनाचा पत्ता साफ होईल. त्यामुळे गांधीनी ही खबरदारी घेतली. व बाबासाहेबांनी हे आधिकार या सर्वांना मिळवुन देऊ नये .म्हणुन गांधीनी पुण्याच्या येरवडा जेल येथे आमरण उपोषण सुरु केले. गांधीजी चा PA देसाई ने त्याच्या डायरीत गांधीजी आणि सरदार पटेल यांचे संवाद लिहून ठेवले आहेत. गांधीजी म्हणतात की “”सरदार तुम मेरी नजर से देखो, ये हरीजन गुंडे भविष्य में हमारे लोगो को पीट रहे है ।” आणि मग हिंदुत्ववाद्यांनी बाबासाहेबाना धमक्या देण्यास सुरु केल्या पण बाबासाहेब डगमगले नाहीत. परंतु गांधीजी जेंव्हा मरावयास टेकले तेंव्हा त्यांच्या अनुयायांनी आंबेडकरांना शेवटची धमकी दिली की जर गांधीजीना मरण आले तर आम्ही भारतात दंगली पेटवू आणि सर्व जाती नष्ट करु…. बाबासाहेब दचकले मी ज्यांच्या साठी हे सर्व करतो आहे तेच जिवंत राहिले नाहीत तर मग मी ह्या ह्क्काला मिळवून तरी काय करु. आणि बाबासाहेबांनी नाईलाजाने ज्या करारावर सही केली तोच हा पुणे करार….आणि त्याचे परिणाम आज ही आपण पहात आहोत. आज ही सत्ता कोणत्याही पक्षाची असो. आधिकार आणि रिमोर्ट ब्राम्हनाच्याच हातात आहे.आणि आज ही आमच्या लोकांच्या कत्तली करत आहेत…!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत