प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपान

बेडगला जिल्हा मार्गावर आंबेडकरांची स्वागत कमान करण्यास शासनाचा हिरवा कंदील आंदोलकांशी चर्चा करूनच निर्णय- डॉ.महेश कुमार कांबळे.

सांगली दि.24 : बेडग ता. मिरज येथून जाणाऱ्या मिरज ते आरग जिल्हा मार्ग रस्त्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वागत कमान बांधण्यास राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनानेही हिरवा कंदील ला दाखवला आहे. या कमानीला येणारा खर्च ही शासन करणार आहे. सातारा जिल्ह्यात आम्ही आलो आहोत. सातारा येथे जिल्हा प्रशासनाने आमची भेट घेऊन चर्चा करून स्वागत कमान बांधण्याचे आश्वासन दिले आहे. पण अन्य दोन मागण्याबाबत अद्याप कोणत्याही निर्णय झालेला नाही. यामुळे आंदोलकांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहे. अशी माहिती आंदोलनाचे प्रमुख डॉ. महेश कुमार कांबळे व साचीन कांबळे यांनी दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रधान सचिव प्रवीण परदेशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोन विषय सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंता श्याम कुंभार यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी मुंबईत बैठक झाली या बैठकीत बेडगी येथील जिल्हा मार्ग रस्त्यावर स्वागत कमान बांधण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयाबाबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिशे, जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर बसवराज तेली यांनी सातारा येथे आंदोलकाशी चर्चा केली मिरज ते आरग जिल्हा मार्ग रस्त्यावर बेडग येथे स्वागत कमानीचा प्रस्ताव आंदोलकाकडे प्रशासनाने दिला आहे या प्रस्तावावर डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी अन्य आंदोलकाशी चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगितले तसेच अन्य मागण्या बाबत ठोस निर्णय घेण्याची ही मागणी डॉक्टर कांबळे यांनी दैनिक जागृत भारत जिल्हा प्रतिनिधीशी बोलताना केली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!