
डॉ बाबासाहेब आंबेडकरांना बुद्ध धम्माचा स्वीकार केल्यानंतर जास्त आयुष्य लाभले नाही, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची बुद्धीस्ट सेमिनारी काढण्याची इच्छा होती की जिथुन बुद्ध धम्माचे प्रचारक निर्माण करता येतील पण त्यांच्या या इच्छेला प्रत्यक्षात आणण्याकरिता त्यांचे विश्वासू सहकारी व थर्मांतर समितीच्या आयोजका पैकी महत्वाची भूमिका पार पाडणारे आयु. वामनराव गोडबोले यांनी चंग बांधला होता. फोटो मध्ये दिसत असलेल्या कुणबी समाजाच्या महादायिका गोपिकाबाई बाजीराव ठाकरे यांनी बाबासाहेबांच्या या स्वप्नपूर्ती करिता आयु. वामनराव गोडबोले यांना दिनांक २२/०४/१९५७ रोजी नागपूर – काटोल रोड वर फेटरी गावापासून डावीकडे तीन किलोमीटर अंतरावर चिंचोली येथील एकूण ११.३७ एकर भुमीदान केली.
आज वामनराव गोडबोले हयात नाहीत पण त्यांनी सुरू केलेला प्रकल्प आज हळूहळू पुर्णत्वास येत आहे.त्याकाळात बाबासाहेबांच्या स्वप्नपूर्ती करिता एका कुणबी समाजातील बाईने स्वतः ची एवढी जमीन दान देणे ही छोटी गोष्ट नाही.
आयुष्यमती गोपिकाबाई बाजीराव ठाकरे या २४/०८/१९५८ रोजी कालकथित झाल्या . पुन्हा एकदा त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
गोपिकाबाई बाजीराव ठाकरे ह्या आपल्या शेतातील भाजीपाला विक्रीसाठी नागपूरच्या कॉटन मार्केट मध्ये येत होत्या. परती वेळेस त्या वामनराव गोडबोले यांच्या बर्डी येथील ऑफिस मध्ये नेहमी यायच्या . एके दिवशी त्यांना मुलबाळ नसल्याने शेत दान देण्याचा मानस सांगितला होता. त्यामुळे जमिनीची कागदपत्रे ही बर्डी च्या ऑफिस मध्येच आणुन दिले. हे प्रत्यक्ष मला ( नवनीत मोटघरे) वामनराव गोडबोले हयात असताना चिंचोली भेटी दरम्यान सांगितले. मी त्यांना विचारले गोपिकाबाई यांनी बौद्ध धम्म स्वीकारला का? उत्तर मिळाले नाही पण येथे पंचशील झेंडा रोवला गेला तेव्हा त्या बुद्ध वंदनेस हजर होत्या.
जन्म – ई स १८९० – मुत्यु २४ ऑगस्ट १९५८
🇪🇺🇧🇯🌺🌺🙏 विनम्र आदरांजली 🙏🌺🌺🇧🇯🇪🇺
संकलन आणि प्रस्तुती – Navneet Motghare
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत