जय श्री राम बोलण्यास भाग पाडत दलित तरुणाला मारहाण; चौघांविरोधात गुन्हा दाखल.

मुंबईत एका दलित तरुणाला धार्मिक घोषणा देण्यास भाग पाडत मारहाण केल्याचं समोर आलं आहे.
कांदिवलीत एका दलित तरुणची वाट अडवून त्याला जय श्री राम बोलण्यास भाग पाडत सहा तरुणांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. २५ सप्टेंबरच्या रात्री तक्रारदार हे कांदिवलीतून रात्री उशिरा घरी परतत असताना गोकुळ नगर येथे या टोळक्यांनी तक्रारदाराची वाट अडवली होती. त्यानंतर या टोळक्याने तक्रारदारावर जय श्री राम बोलण्यासाठी दबाव टाकला. तक्रारदार जय श्री राम बोलत नाही म्हणून त्याला हिनवत मारहाण केली. वेळीच तक्रारदारांचा भाऊ घटनास्थळी पोहोचला. त्याने मारहाण झालेल्या तरुणाला उपचाराकरिता जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तक्रारदारांनी नोंदवलेल्या तक्रारीनंतर कांदिवली पोलिसांनी चौघांविरोधात कलम ३२३, ३४१, ५०४, ५०६, ३४ भादवी अंतर्गत गुन्हा दाखल केला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत