दहावी -बारावी निकालाच्या अफवांचा सुळसुळाट ; बोर्डाच्या अध्यक्षांनीच सांगितले निकाल केव्हा..!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२४ फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी- बारावीच्या परीक्षकांचा निकाल केव्हा जाहीर होणार ? याबाबत मोठी उत्सुकता आहे.
गेल्या काही दिवसांपासून निकालाबाबत समाज माध्यमांवर अफवा पसरवल्या जात आहेत.
शुक्रवारी दिवसभर विद्यार्थी व पालक यांचा निकालावरून गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, विद्यार्थ्यांनी व पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये,
बोर्डाकडून निकालाबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.
गोसावी म्हणाले, राज्य मंडळातर्फे इयत्ता बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात तर दहावीचा निकाल मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे कोणीही निकालाबाबतच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये. निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे. काम पूर्ण झाल्यावर बोर्डातर्फे ऑनलाईन निकालाची तारीख अधिकृपणे जाहीर केली जाईल.
विद्यार्थी व पालकांमध्ये निकालाबाबत मोठी उत्सुकता आहे. त्यामुळे समाज माध्यमावर प्रसिध्द होणाऱ्या निराधार बातम्यांवर अनेकांनी विश्वास ठेवला. काही शाळांमधील शिक्षकांना याबाबत विचारणा करण्यात आली. बोर्डातील दूरध्वनी दिवसभर वाजत होता. पण बारावीचा निकाल आज जाहीर झालाच नाही कारण ती केवळ अफवा होती.
दोन्ही निकाल मे महिन्यातच जाहीर होणार आहेत.
पण बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात तर दहावीचा निकाल मे महिन्याच्या चौथ्या आठडयात जाहीर होणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत