रोखठोक मत! परखड विचार!!

सरकारचं डोकं ताळ्यावर आहे का? किंवा वेड्यांच सोंग घेऊन जनतेला खूळं करीत आहे.
तथागतांनी सांगितले की, सर्व दुःखाचं मूळ अज्ञानात आहे,तर राष्ट्रपिता महात्मा फुले, सावित्रीमाई, फातिमा शेख यांनी अतोनात हाल अपेष्टा सहन करीत सर्वांसाठी शाळा सुरू केल्या, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी असा विचार केला की, मी शाळा शिकल्यामुळे मी ज्ञानी झालो, माझ्या समाजातील लोकांना गुलामीची जाणीव करून देण्यासाठी, स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी त्यांनी शिकले पाहिजे म्हणूनच चवदार तळ्याचे सत्याग्रहा बरोबरच आपल्या समाजाच्या उत्कर्षासाठी व समाज सुधारणेच्या पाया म्हणून शाळा सुरू करण्यासाठी असएबलईत अर्ज दाखल केला त्या अर्जात आपले मत व्यक्त करताना नगर पालिका, महानगर पालिका, जिल्हा परिषदेच्या शाळा, ग्रामीण भागातील वस्ती, तांडा या ठिकाणी शाळा सुरू कराव्यात,या शाळेत सर्व जाती, जनजाती विद्यार्थी विद्यार्थिनी यांना प्रवेश द्यावा,या ठिकाणी शिक्षकांची भरती करावी,हा दिवस होता ८ आकटोबर १९२८ म्हणजे आजपासून ९५ वर्षांपूर्वी. जे महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना समजलं ते आजच्या आधुनिक काळातील शाहू, फुले, आंबेडकर यांचं नाव घेऊन त्याविरुद्ध वागणा-या राज्यकर्ते यांना काय संबोधायचे? मराठी शाळा बंद करणे, समूह शाळा सुरू करणे याला काय म्हणावे? दारुच्या दुकानाला परवानगी तर सहा ते चौदा वर्षांच्या मुलास मोफत शिक्षण हे संविधानातील मूलभूत हक्कात असून सत्तेच्या जोरावर संविधानाची पायमल्ली करणा-या सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार आहे काय?
याला कारण म्हणजे तुम्ही आम्ही आणि ज्या प्रमाणात संविधान साक्षरता होणं गरजेचं आहे त्याप्रमाणात होत नाही,आज आम्ही षंढ झालों आहोत, अन्याय, अत्याचार यांबाबत रस्त्यावर उतरून जाब विचारावा वाटत नाही कशाचेच सोयरसुतक आम्हाला आज नाही याचाच अर्थ आम्ही आज संपूर्ण गुलामगिरी पत्करायला तयार होत आहोत असे वाटते.
भारत देशातील तमाम जनतेला एवढेंच सांगणं आहे की,रात्रच नव्हे तर दिवसही वै-यांचा आहे उद्देशेके मध्येच सांगितले आहे की आम्ही भारताचे लोक म्हणजेच हे सत्ताधारी हे आमचे मालक नसून सेवक आहेत,खरे मालक आम्ही आहोत म्हणून उठा …पेटा… जाग्रृत होऊन एकत्रितपणे या सर्वांचा मुकाबला करण्यासाठी तयार व्हा……!
– अशोक तुळशीराम भवरे सिडको, नांदेड.
संविधान प्रचारक/प्रसारक.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत