कुंभमेळा बहुजनांना गुलामी ठेवण्याचे ब्राह्मणी षडयंत्र

मान्यतेप्रमाणे देशात चार ठिकाणी दर बारा वर्षांनी कुंभमेळे भरतात. देशाच्या दक्षिण भागातसुद्धा नवीन कुंभमेळे भरायला लागली आहेत. म्हणजे एकूण सरासरी काढली तर दीड वर्षांनी कुंभमेळे भरत असतात. प्रत्येक वेळेस सरकार शेकडो कोटी रुपये खर्च करते. लाखो लोक कुंभमेळ्यासाठी येतात साल 2003 मध्ये नाशिक शहरात झालेल्या कुंभमेळ्यात एका साधूने पैशाची नाणी फेकले. पैसे घेण्यासाठी चेंगरा चेंगरी झाली त्यात 33 लोक मृत्यूमुखी पडले तर 200 लोक जायबंदी झाले. या भक्तांना तथाकथित देवाने वाचविले नाही म्हणजे कुंभमेळ्यातील देव हे भक्तांना वाचविणारे नसतात तर मारणारे असतात हे सिद्धच होते
कुंभमेळ्यात आंघोळ केली तर सर्व पापे नष्ट होतात असा एक गैरसमज आहे. कुंभमेळा हा पाप भ्रष्टाचार करण्यासाठीचा एक मार्ग आहे. पाप भ्रष्टाचार करा व कुंभमेळ्यात जाऊन डुबकी मारा. केलेले पाप नष्ट होऊन पुढचे पाप भ्रष्टाचार करायला रान मोकळे होईल मग परत पाप धुण्यासाठी कुंभमेळा घ्या हे वर्षानुवर्षे चालतच राहणार आहे. यांनी समाजाचा विकास होत नाही तर अधोगतीच होते. कुंभमेळ्यात आंघोळ केल्याने अनेकांना चर्मरोग व बीमाऱ्या झालेल्या आहेत. कुंभमेळे हे भट ब्राह्मणांचे पैसे कमविण्याचे साधन आहे तर बहुजनांचे खिसे खाली करण्याची प्रथा आहे
कुंभमेळ्यात येणाऱ्या हजारो साधूंना पाप मुक्तीची गरजच काय हे तर वैरागी असतात. पापमुक्त असतात. या साधूंना पापाची भीती का वाटावी? हा देश देव देवतांनी समृद्ध आहे. या देशात 33 कोटी देव आहेत तर मग या देशाची गरीबी नष्ट का होत नाही? देवाचा एक भक्त भुका कंगाल तर दुसरा भक्त गर्भ श्रीमंत ही असमानता नष्ट का होत नाही? देशात दुष्काळ का पडतो? कुपोषणाने लोक मरण का पावत आहेत? असे प्रश्न विचारण्याचा व त्याची उत्तरे शोधण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही; कोणी केला तर त्याला नास्तिक व धर्मविरोधी ठरविण्यात येते
समाजात गुलामीची झालर पाघरंलेल्या गुलामांकडून अशा प्रश्नकर्त्यांची कुचेष्टा करण्यात येते. दगडाला शेंदूर फासून त्याला देव पण देण्याची प्रक्रिया काही विशिष्ट लोक करीत असतात. त्यात त्यांचा स्वार्थ असतो हे जाणणे इतका बहुजन समाज प्रगल्भ नाही
हिंदू धर्माचे आज व्यापारीकरण झाले आहे देवदर्शनासाठी पैसे घेणे नदीचे घाणेरडे पाणी पवित्र जल म्हणून विकणे, खराब तेलात काढलेली मिठाई प्रसाद म्हणून विकणे, भक्ताने देवाला वाहिलेला नारळ परत मागच्या दारातून दुकानात येणे असे प्रकार राजरोसपणे चालू आहे. हिंदूधर्म हा खोट्या व काल्पनिक गोष्टींचा समुच्चय आहे
कुंभमेळ्यात प्रथम आंघोळ कोणी करावी? शाही मिरवणूक प्रथम कोणी काढावी? यावर वैरागी साधू भांडण करीत असतात. कुंभमेळ्यात येणारे साधूचे आखाडे एकमेकांवर बहिष्कार टाकत असतात. एवढेच नव्हे तर एकमेकांना मारण्याचे प्रकार घडत असतात. निर्मोही, दिगंबर, खालसा निर्वाणी असे आखाडेच आहेत. साधूंचे साधू मोठे हाय फाय असतात त्यांच्याकडे मोठमोठ्या गाड्या, मोबाईल्स मोठी सिक्युरिटी व शेकडो एकर जमिनी असतात. मोहमाया यापासून दूर असलेल्या साधूकडे फार मोठी संपत्ती असते. हे साधू चरस गांजा दारू सर्रास पिताना दिसतात तरीही लोक नागड्या साधूंच्या पाया पडत असतात. असे कुंभमेळे हे लोकांना दैववादी बनवीत असतात इतर देशातील सरकार लोकांना विज्ञानवादी बनवत असतात. पण आपले सरकार लोकांना धर्मांध बनवत असते. गुंड व भ्रष्टाचारी प्रवृत्तीतून तयार झालेल्या चंद्रास्वामी नरेंद्र महाराज व आसाराम बापू सारख्या बाबांचा आदर्श समोर ठेवला जातो
कुंभमेळा कसा असतो ते बघायला २००३ यावर्षी नाशिकला गेलो होतो बघितले तर स्त्रिया नंग्या साधूच्या पाया पडत होत्या; साधू गांजा व चरस ओढत होते; अभद्र भाषेत लोकांना शिव्या देत होते; काही साधू जवळ मोबाईल व वातानुकूलित मोटारी होत्या. भर पावसात मी व माझे मित्र प्रफुल मेश्राम व रामराव पवार त्रंबकेश्वरच्या पहाडीवर चढलो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बहुजन आदिवासींच्या झोपड्या आहेत. चणे फुटाणे व पहाडीवरून तीर्थ म्हणून पाणी आणण्यासाठी बाटली विकण्याचा व्यवसाय करतात. वर टेकडीवर चढलो तेव्हा गोदावरीच्या उगमाजवळ असलेल्या मंदिरात एक ब्राह्मण मंदिरातील एका व्यक्तीकडून पैशाचा हिशोब घेत होता
भट गेल्यानंतर मी त्या व्यक्तीच्या विचारले की तुम्ही या मंदिराची देखभाल करत आहात त्याने तुमच्याकडून पैसे का घेतले? तेव्हा तो बोलला आम्ही त्याचे नोकर आहोत तो त्रंबकेश्वरचा भट ब्राह्मण आहे. हजार वर्षापासून त्याच्या पूर्वजांनी ह्या जागेवर व मंदिरावर मालकी आहे ती मला तो मला महिन्याला पाचशे रुपये देतो रोज संध्याकाळी येऊन लोकांनी दान केलेले पैसे घेऊन जातो. टेकडीवरच दुसऱ्या बाजूला नाथपंथीयांचे मंदिर आहे तिथला साधू आम्हाला सिगरेट पिण्यासाठी माचीस मागत होता व इथे पैसे टाकल्याशिवाय पुण्य मिळत नाही असे म्हणत होता. पहाडीवरून खाली उतरताना माचीस मागणारा साधू एका झोपडीत दारू पीत होता
त्र्यंबकेश्वरच्या पहाडीवर चमत्कारी असे काहीच नव्हते कोरलेल्या आखूड गुहेत काही देवांच्या मुर्त्या व पिंडी ठेवलेल्या आहेत पण भट ब्राह्मणांनी त्यांच्या चमत्कारिक कथा लिहिल्यामुळे तयार केलेली तीर्थक्षेत्र हे बहुजनांना लुबाडण्याचे केंद्र बनलेले आहेत
हा लेख बहुजनांचे मारेकरी या बापू राऊत लिखित पुस्तकातून जसा आहे तसा घेतलेला आहे
📝9326365396📝
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत