
रुबाब असा, भासे राजा जसा,
सुटाबुटात शोभतोय,
भिमराया कसा,
चेहरा करारी,
उत्कर्षाचे समोर बोट,
डाव्या हातात संविधान ग्रेट,
जणू सांगतोय,
घ्या विकासाची झेप,
गगनाभेदी थेट.!
अडकतो घास गळ्यात,
पाहुनी प्रगती दीन दुबळ्यांची,
नाही बघवत, उन्नती वंचितांची,
पण जरब असे,
संविधानातील कायद्याची,
म्हणुन मुर्दाड करीती,
विटंबना पुतळ्याची.!
करू देत विटंबना, मोडतोड,
कितीही पुतळ्यांची, तसबिरिंची,
अथवा संविधानाच्या प्रतिकृतीची,
नसे ठाऊक गर्दभांना,
असे केल्याने नाही बदलत,
आचार, विचार, अन,
खोलवर मुरलेली,जाणीव हक्कांची,
मजबूत भिंत संविधानाची.!
तुम्ही आरक्षणार्थि,
गड शाबूत ठेवा,फक्त एकोप्याचा,
ओळखा कावा,
आपसात कलागत लावण्याचा,
फोडा अन झोडा,
डाव उधळून लावा.!
सजग राहून, अंमलबजावणीवर,
करडी नजर ठेवा,
लक्षात येता गैरवापर,
पेटवा विरोधाच्या, मशाली घरोघरी,
नका घाबरू, दिलीत कवच कुंडले,
संविधानाची जगात न्यारी.!
नका घाबरू, दिलीत कवच कुंडले,
संविधानाची जगात न्यारी.!!
नका घाबरू, दिलीत कवच कुंडले,
संविधानात जगात न्यारी.!!!
अरुण निकम,
9323249487.
मुंबई .
दिनांक …18/08/2025.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत