
आज ८ मार्च,हा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो ,पण आपल्याला माहित आहे का ,निसर्गानेच महिलांवर खुप मोठी कृपा करुन ठेवले आली आहे .अगदी पाषाण काळापासून स्त्रीला महत्त्वाचे स्थान आहे पाषाण काळातील अनेक स्त्री प्रतिमा मिळाल्या आहेत पाषाण काळाचे मुख्यत्वे ३ भागात विभाजन केले जाते १)पुर्व पाषाण काळ २)मध्य पाषाण काळ ३)नव पाषाण काळ.
मध्य पाषाण काळात स्त्रीयांनी भटकंती चे जिवन सोडून पारिवारीक जिवन जगायला सुरूवात केली होती याचे पुरावे भिमबेटकाच्या गुफांमध्ये पाषाणांवर चित्रांच्या स्वरूपात सापडले आहेत
नवपाषण काळात स्त्रीयांनीच शेतीचा शोध लावला होता. स्त्री ही परीवार सांभाळणारी,नव निर्माण कर्ति कर्तव्य दक्ष, म्हणुन अनादी काळापासून तीची पूजा केली जात होती,व्यापार क्षेत्रात देखील दागीणे बनवने,मातीच्या भांड्यांवर कला कुसर करणे ई.त्यांचे व्यापार ईजिप्त ,रोम सारख्या देशात होत असल्याचे अनेक पुरावे पुरातत्व खात्याला मिळाले आहेत
वैदिक काळात स्त्रीच्या शक्ती ची ओळख मिटवण्याचे काम झाले,आणि तिला शुद्रांपेक्षाही खालचा दर्जा दिला गेला
इ.स पूर्व सहाव्या शतकात वैदिक काळानंतर व्यवहारिक कारणास्तव सुरुवातीला बुद्धांनी स्त्रियांना संघात प्रवेश नाकारला होता परंतु स्त्रीचे कर्तुत्व एवढं मोठं होतं तिची जिद्द होती की तिने संघात प्रवेश मिळवला आणि त्या काळात अरहंत भिक्खुं प्रमाणे स्त्री अरहंत भिक्खुनी सुद्धा मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या धार्मिक कार्यात, अध्यात्मिक कार्यात,राजकीय क्षेत्रात देखील स्त्री नेहमीच पुढे राहिलेली आहे
भारतातल्या रहिवासी असलेल्या स्त्रिया या नेहमीच कर्तृत्ववान राहिल्या आहेत जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी त्यांच्या क्षेत्रात त्यानी आपले पुर्ण योगदान दिलेले आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या काळात स्त्रीचे महत्व ,तिची कार्य क्षमता ओळखुनच क्रांतीज्योती फुलेंनी शिक्षणाची धुरा माता सावित्रीकडे सोपवली होती आणि आपल्या कार्याला ,जबाबदारीला तीने यशस्वी करून दाखवले . बाबासाहेबांनी सुद्धा हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून स्त्रियांना भरपूर सवलती विद्या,हक्क दिले ,ते तीची क्षमता ओळखुनच असावेत. त्या अधिकारांचा फायदा घेऊन अनेक महिला उच्च पदावर गेल्या देखील पण आजही अशी परिस्थिती दिसते की महिला कर्मकांडात मिथ्या दृष्टीमध्ये अजूनही अडकलेल्या आहेत निसर्गतः स्त्रीकडे विशेष शक्ती असते पण तीला ती आओळखता आली पाहिजे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरचे वक्तव्य आहे की,समाजाची प्रगती झाली हे ओळखण्याचं माध्यम म्हणजे त्या समाजातील स्त्रियांची वैचारीक प्रगती होय.
समाजातील स्त्री प्रगत असेल तर समजावे तो समाज प्रगत आहे.
जय भिम 🙏
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत