साद घालतो कबीर – प्राचार्य वसंत वावरे

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनी दिलेले भाषण अनेकांना आठवत असेल. या भाषणात बाबासाहेब गरीब पण सदाचाराने राहणारी आणि जवळ भरपूर पैसा असणारी, खाण्यापिण्यात चंगळ असणारी पण वेश्या असलेली अशा दोन स्त्रियांचं वर्णन करतात. बाबासाहेब पुढे असंही सांगतात – मनुष्याला इज्जत प्यारी असते – लाभ नव्हे. गरीब स्त्रीला फाटकी साडी असेल-गळ्यात सोन्यामोत्याच्या माळा नसतील आणि वेश्येजवळ भारी कपडे व गळ्यात हिऱ्या सोन्याच्या माळा असतील पण समाजाचा या दोघींकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो.सदाचारी स्त्रीकडे पाहतांना आदराने नजर आपोआपच खाली वळते.
पतिबरता मैली भली
गले कांच की पोत
सब सखीयॉ मे यो दिपै
ज्यो सूरज की ज्योत
आपल्या पतीशी एकनिष्ठ राहणारी म्हणजे पतिव्रता. या पतिव्रतेचं शरीर अस्वच्छ असेल, गळ्यात सोन्यामोत्याच्या माळे ऐवजी काचेची माळ असेल. पण अशी स्त्री तिच्या सर्व श्रीमंत मैत्रिणीमध्ये सूर्याच्या तेजासारखी तळपते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत