पीएच डी विद्यार्थ्यांच्या खोल्या परकीय भाषेला देण्यावरून विद्यार्थ्यांचा असंतोष, प्रो व्हीसी चे आश्वासन.

आर टी एम नागपूर विद्यापीठांतर्गत येणाऱ्या पाली प्राकृत व आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्रातील संशोधक विद्यार्थ्यांच्या खोल्या परकीय भाषा शिकणाऱ्यांना देण्याच्या विरोधात पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांनी वरिष्ठांना निवेदनाद्वारे घेराव घालून चांगलेच धारेवर धरले. याबाबत सविस्तर मिळालेली माहिती अशी की रामदासपेठ येथील विद्यापीठ ग्रंथालयामागे पाली प्राकृत व बौद्ध अध्ययन पदव्युत्तर विभागाची आंतरराष्ट्रीय दर्जाची दुमजली स्वतंत्र इमारत आहे. येथे पाली व बौद्ध अध्ययन पदव्युत्तर विभागाचे क्लासेस चालतात. तसेच येथे एचडी चे संशोधन केंद्र असल्यामुळे व भव्य ग्रंथालयामुळे मोठ्या प्रमाणात संशोधक विद्यार्थी सुद्धा संशोधनाचे कार्य करतात.याच विषयातील सर्टिफिकेट कोर्सेस सुरू करण्यासाठी विभाग प्रयत्नशील आहे. अशातच विद्यापीठ ग्रंथालयात सुरू असलेले परकीय भाषेच्या क्लासेससाठी या बिल्डिंगमधील संशोधकांच्यावर्गखोल्या
देण्यासाठी कुलगुरूंनी विभाग प्रमुखाला पत्र दिल्याचे विद्यार्थ्यांना कळले. त्यामुळे संशोधक व विद्यार्थी यांनी पाली प्राकृत चे विभाग प्रमुख प्रा डॉ. नीरज बोधी यांची भेट घेऊन त्यांना या विरोधात एक निवेदन दिले. तसेच कलगुरू अनुपस्थित असल्याने प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे व मानव्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. शाम कोरेट्टी यांना निवेदन दिले.
निवेदनात कुठल्याही परिस्थितीत आधीच खोल्यांचा तुटवडा असलेल्या संशोधकांच्या खोल्या परकीय भाषा वाल्यांना देऊन येथील शांतता भंग करू नये अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा 32विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे विभाग प्रमुख व विद्यापीठ प्रमुखांना दिला. यावेळी डॉ. दुधे यांनी संशोधक विद्याथ्यांच्या हितांचाच निर्णय घेतला जाईल व विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याचे आश्वासन देऊन विषय नजरेत आणून दिल्याबद्दल विद्यार्थ्यांना धन्यवाद दिले.शिष्टमंडळात योगिता पाटील, लीला मानवटकर, आशा मेश्राम, अमला शील, मंजुषा रामटेके, शुभांगी वासनिक, एड लालदेव नंदेश्वर, महानागरत्न जुमळे, उत्तम शेवडे, संदीप शंभरकर, जगन्नाथ पोहेकर, किशोर रामटेके, विजय वासनिक, किशोर भैसारे, सचिन देव आदी संशोधक व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत