ठाकरेच बाळासाहेबांची संस्कृती विसरले- शिंदे

दैनिक जागृत भारत वृत्तसेवा – राज्यात अवकाळी पाऊस सुरू आहे, यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना अद्यापही मदत न मिळाल्याने काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. या टीकेवरुन काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
“मी माझं काम करतो, ते बाळासाहेबांची संस्कृती विसरले आहेत, बाळासाहेबांची शिकवण विसरलेत. त्यांच्या आरोप करणे हा एककलमी कार्यक्रम आहे, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर केली. “महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. राज्याला एक परंपरा आहे, आरोप करणे, खालच्या पातळीत आरोप करणे, हे आमच्या संस्कृतीत नाही. त्यांच्याबाबतीत खुद्द शरद पवार यांनीही आपल्या पुस्तकात लिहिले आहे, असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हे सरकार काम करणारे आहे, घोषणा करुन फसवणारे नाही. पीकविमा एक रुपयात देण्याचा निर्णय आम्ही घेतला. शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहणारे सरकार आमचे आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पोसणारं सरकार हे नाही. आम्ही सर्व पालकमंत्र्यांना सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना मदत मिळेल, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत