रस्ते आणि अपघात

प्रा डाॅ.दिलीपकुमार कसबे
रस्ते आणि अपघात यांचे अतूट नाते आहे.चांगला रस्ता असला तरी अपघात घडतो.आणि खराब रस्ता असला तरी ही अपघात घडतो.मग अपघाताचे नेमके काय कारण असावे याच्यावर विचार करणे गरजेचे आहे. चालणाऱ्या पासून ते कोणत्याही वाहन चालकांने याच्यावर शांत पणे विचार करावयास हवा.निसर्गातील प्रत्येक वस्तुची मोडतोड होणार हे जरी खरे असले तरी काळजी घेणे हे मानवाच्या हाती शंभर टक्के नसले तरी ही ऐंशी ते नव्वद टक्के त्याच्या हातातच आहे असे म्हणावे लागेल. म्हणून प्रत्येकांने काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे की ज्यामधून इतरांचा , स्वत:चा, वा अन्य प्राण्यांच्या जीवाचा विचार होऊ शकतो.जितके सुरक्षित राहता येईल तेवढे सुरक्षित राहिले पाहिजे.पण अलिकडे दिवसेंदिवस वाहतुकीचे प्रमाण वाढू लागलेले आहे.कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रवास करावा लागत असतो.पूर्वी बैलगाडी,घोडागाडी, घोडा,सायकल ,एकाद दूसरी दोन चाकी,चार चाकी वाहने गावा गावात दिसायची.अशी प्रवासाची साधने होती.लोक पायी ही खूप प्रवास करायचे चालायचे.डोक्या-खांद्यावरून ओझी वहायचे त्याकाळी हे अपघाताचे प्रमाण नगण्य असायचे.म्हणजे अपघात होत नव्हते असे नाही पण त्याची मर्यादा होती. मात्र आज आपण पाहतोय,वाचतोय,अनुभव घेतोय, सामोरे जातोय.वैज्ञानिक प्रगती, शैक्षणिक विकास, आर्थिक विकास,वाढती बुद्धिमता, महाराजांचे,साधू संतांचे चांगल्या जीवन विषयक विचारांचा प्रचार प्रसार जरी होत असला तरी ही कुठे तरी काही तरी कमतरता जाणवतांना दिसते आहे असे म्हणावे लागते.मग देवदर्शन करायला जातांना चांगली वेळ पाहून जावो अथवा न पाहता जावो. देवदर्शन करून येतांना,संध्याकाळी कामावरून घरी येतांना,शाळेत,काॅलेजला जातांना येतांना किंवा चालतांना,मग कसल्याही कामा साठीचा प्रवास असो किंवा रस्त्याच्या कडेला उभा राहिलेला असो. अथवा चालणारा असो वा इतर कोणत्याही कामी बाहेर जाणारी व्यक्ती संध्याकाळी परत येईल की नाही याची खात्री देणे अवघड झालेले आहे.जेव्हा एखादा अपघात घडतो.घडल्यानंतर जो कोणी सुरक्षित असतो त्याच्या कडे चौकशी केल्यानंतर समजते नेमके कसे घडले.पण त्यांना ही सर्वच व्यवस्थित सांगता येईल असे नाही.अतिशय विचित्र प्रकारचे अपघात घडतात.लोक म्हणतात जो पाप करतो त्याला कधी तरी अद्दल घडते.ही आपल्या मनाची भोळी भाभडी कल्पना आहे.वास्तवात तसे काही नसते. चांगल्याला ही मुकावे लागते. मग नेमके काय म्हणायचे. सुखी ठेव म्हणून लोक देवाकडे मागणे करतात. पण आपण पेपर ची बातमी वाचतो. पाली वरून देवदर्शन करून येतांना तरुणाचा अपघात घडला.नासिक वरून येणाऱ्या भावीकांच्या गाडीच्या अपघातात इतक्या लोकांचा जीव गेला. गुजरात वरून येणाऱ्या लोकांचा अमूक ठिकाणी अपघात झाला. मुंबई सोलापूर हायवे वर दोन वाहनांचा अपघात झाला. समृद्धी राष्ट्रीय महामार्ग तर अपघाताच्या बाबतीत अग्रस्थानी आहे. तो सारखा चर्चेतच आहे. जर घडणाऱ्या अपघातावर मर्यादा आणावयाच्या असतील तर काही बाबी विचार पूर्वक करावयास हव्यात.तरच आपण स्वतः व इतरांना ही वाचवू शकतो.अपघातात लोक मरतात, अपंग होतात. कोणाचा तरी आधार तुटतो.मुलांना आई-वडीलांपासून पोरखे व्हावे लागते.एखाद्या घरचा तरूण,उम्दा, कर्तृत्ववान, घरचा लाल,लाली,आयुश्याची सुरुवात होण्यापूर्वीच, आयुशष्यास सुरूवात केल्याबरोबरच अपघातात बळी पडलेले असतात. अशा कितीतरी जणांना प्राणांना मुकावे लागते.कोणाचे कुटुंब उध्वस्त होते.अशा घटना या दुर्दैवी आहेत .हे घडू नये यासाठी दक्ष रहायला हवे.म्हणून जेवढे शक्य असेल तेवढी काळजी घेणे गरजेचे आहे.तर काही प्रमाणात अपघात कमी होतील.आज रस्त्यावर पाहिले तर इतकी वाहने दिसतात की नेमके कोण कुठे निघाले आहे हे सांगता येणार. नाही कोणाचे महत्वाचे काम आहे आणि कोणाचे नाही.हे ही सांगता येणार नाही.पण जो तो विमानाचा वेग धरून धावतांना दिसतोय.गाडी पळवतोय. मग दोन चाकी वाहन असो,तीन चाकी वाहन असो अथवा चार चाकी असो.वेगाची मर्यादा पाळतीलच असे नाही. जणू काही वाहन चालविण्याच्या स्पर्धा चालू आहेत की काय असे वाटते .मग वाहतुकीच्या नियमांचे तीन तेरा वाजत असतात.प्रत्येक वाहनाला कमाल व किमान वेग मर्यादा कंपनी ने घालून दिलेली आहे.वाहन चालक किमान मर्यादा पाहतीलच असे नाही. एअर ब्रेक म्हणजे तरूणांना अति आत्मविश्वास. चार चाकी गाडीत ही एअर ब्रेक, एअर बॅग म्हणजे सबकी जान हमारी मुठ्ठी में अशा अविर्भावात हे वाहनचालक वाहन चालवित असतात. माणसे वाहून नेणाऱ्या गाड्यांचे ड्रायव्हर सुद्धा मग एस.टी असो की प्रायवेट ट्रॅव्हल्स बेभान होऊन वाहन चालवित असतात.पण किमान त्यांनी अतिशय काळजी घेतली पाहिजे.आपल्या गाडीत देशाचे आधार स्तंभ बसलेले आहेत.अनेक जीव आहेत.ते काळजी घेतात ही. पण प्रत्येक वेळी सावध असले पाहिजे. यावर त्या वाहन चालकांनी कुठेतरी आत्मचिंतन करावयास हवे. स्टील,पत्रे यांची वाहतूक करणारे,ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर वाहनचालक योग्य ती काळजी घेत असले तरी सुद्धा प्रत्येक वेळी ती काळजी घेतीलच असे नाही.कारण अपघात घडल्यानंतर काहीच करता येत नाही म्हणून वाहन चालवितांना, गाडी रस्यावर नेण्यापूर्वी गाडीची काळजी,स्वत:ची काळजी घेऊन बाहेर पडावे तरच आपण सुरक्षित व इतरांना ही सुरक्षित ठेवू शकतो.पूर्वी ठराविक कंपन्यां वाहन क्षेत्रात कार्यरत होत्या. पण अलिकडे जागतिकीकरणात अनेक विदेशी वाहन कंपन्यांच्या दोन चाकी ,चार चाकी कंपन्यांच्या पेट्रोल, डिझेल, गॅस, इलेक्ट्रिक वर चालणारी वाहने मोठ्या संख्येने विक्रीस दिसतात. त्यातच बँकेच्या वाढत्या वाहन कर्ज योजना .एक रूपयात गाडी.केवळ रेशनिंग कार्डावर गाडी या सारख्या जाहिरात बाजी मुळे गरजू व गरज नसणारे ही वाहन खरेदी करतात. पण गरज नाही असे म्हणता येत नाही.कोणात्याही वस्तूची गरज नाही असे म्हणता येत नाही. प्रतेक वस्तूची गरज कमी अधिक प्रमाणात असतेच.
त्यामुळे रस्त्यावर सकाळी दहा व संध्याकाळी पाच च्या आसपास इतकी वाहने दिसतात की. थोड्या थोड्या अंतरावर पोहोचण्यास खूप वेळ लागतो. मग कधी ब्रेक फेल,तर कधी टायर फुटतो.तर कधी चालकास ॲटॅक येतो त्यामुळे ही जीवघेणे अपघात घडतात.यांत्रिक, शारीरिक बिघाड झाल्यास काही ही करता येत नाही.पण जेवढे शक्य होईल तेवढे अपघातापासून सुरक्षित रहायला हवे.
अपघात कमी व्हावयाचे असतील तर
१) पालकांनी लहान मुलांच्या हातात गाडी देण्याचे टाळले पाहिजे.
२) गरज असेल तरच प्रवास करावा अन्यत: टाळला जावा.
३) शक्यतो रात्री सात वाजेपर्यंत प्रवास करावा. म्हणजेच जो पर्यंत सूर्यप्रकाश आहे तो पर्यंत च वाहन चालविणे सुरक्षेच्या दृष्टीने फायद्याचे आहे.
४)वाहन चालकांनी आम्ली पदार्थांपासून दूर रहायला हवे.
५)एस.टी.चालक, प्रवासी वाहतूक करणारे चालक यांच्याकडून बाँडवर लिहून घ्यावे की दारू,गांजा व अन्य नशीली पदार्थापासून अलिप्त राहीन.अंतर पाहून निघताना, वाटेत मध्येच व पोहचल्यानंतर त्यांची मद्यप्राशन पासून अलिप्त असल्याची तपासणी करावी.तसे आढळल्यास ताबडतोब अशा चालकास माफी न देता .कुटूंबाचा विचार न करता निलंबित करण्यात यावे.
५) वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे.
६) वाहन चालकांनी वाहतूकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे.
६) समृद्धी हायवेवर काही अंतरावर तपासणी थांबे करण्यात यावेत.कारण सरळ,नीट,एक पारखी रस्ते असल्यामुळे चालक शंभर,सव्वाशे पर्यंत च्या गतीचे सातत्य ठेवतात. समोर केवळ मृगजळ असते.एसी चे मंद गार वारे डोळ्यावर गुंगी आणते.म्हणून.
७) राष्ट्रीय महामार्गावर एखाद्या वाहनास पुढे जायचे असेल तर त्या चालकांनी डाव्या बाजूने वाहन पुढे नेण्याचा आग्रह टाळावा.मनाला आवर घालावी.
८) एखादा वाहनचालक पुढे गेला.म्हणून त्याच्याशी स्पर्धा करणे टाळावे.
९) रात्री, दिवसा वाहन चालवित असतांना झोपेची गुंगी जाणवत असल्यास. पुरेसी जागा,हाॅटेल दिसल्यास वाहन योग्य ठिकाणी पार्क करून चालकांने थोडी विश्रांती घेऊन फ्रेश होऊन नंतर वाहन चालवावे.
१०) वाहन चालवित असतांना मोबाईल फोनवरील बोलणे टाळावे.अन्यत: गाडी बाजूला उभी करून फोनवरील बोलावे.आणि बोलणे संपल्यानंतर गाडी चे ड्रायव्हिंग करावे.
११) चालकांने प्रवासास सुरूवात करण्यापूर्वी चाकातील हवा,टायर याची पाहणी करावी.
१२) वाहन चालकांनी वाहन वेगाच्या किमान मर्यादेचे पालन करावे.
१३) ‘जान है तो जहान है’ हे नेहमी लक्षात ठेवावे.
१४) प्रवासास वेळेपूर्वी निघावे,वेळेत पोहचावे.
१५ ) वाहन हे यंत्र आहे त्याची अति परीक्षा वाहन चालकांनी करू नये .आपणास आपल्या वाहनाचा अंदाज असतो,पण समोरच्या वाहन चालकास पादचार्यास नसतो ही बाब ध्यानात असावी.
१६) रस्ता राज्य मार्ग असो राष्ट्रीय महामार्ग असो .शेवटी तो रस्ता आहे.कुठेतरी खड्डा पडलेला असू शकतो स्पीड ब्रेकर येऊ शकतो. म्हणून वेग मर्यादा, अचूक लक्ष्य असावे.
१७) सतत जागृत असावे.पुढील वाहन आणि आपले वाहन यात सुरक्षित किमान दहा फूट अंतर असावे.डोळेझाक पणे वाहन चालविणे धोक्याचे.अन्यत:दुहेरी,तिहेरी वाहनांचे अपघात घडू शकतात.
१८) शक्यतो रात्रभर प्रवास टाळावेत. किमान रात्री अडीच ते पहाटे चार पर्यंत. योग्य ठिकाण पाहून विश्रांती घ्यावी.
१९) शक्यतो तरूणांनी वाहनांशी मस्ती टाळावी.एअर ब्रेक,एअर बॅग यावर पूर्ण विसंबून राहू नये .ते तुमच्या सुरक्षेसाठीच आहेत.पण शेवटी प्रत्येकाची मर्यादा असते हे विसरता कामा नये.
१९) एखादी वाईट घटना घडली आहे.म्हणून अति वेगाने वाहन चालवित असतांना मनावरील ताबा सुटू शकतो म्हणून खूप गडबड करणे शक्यतो टाळावे.
२०) वाहन सुरू असतांना ड्रायव्हर, किंवा टू व्हीलर वर पाठीमागे बसलेले यांनी मोबाईल वरील फोन चालू करणे,बोलणे,वाटसाप पाहणे टाळावे.वाहन चालकाकडे लक्ष्य असावे.अधून मधून शक्य होईल तसे सावध करावे.
याशिवाय प्रत्येक चालक, बसलेले प्रवासी यांनी रस्त्याने जाणाऱ्या वाहनापासून सावध कसे राहता येईल शक्यतो इतरांना कसा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.पहाटे चार वाजता. संध्याकाळी सात वाजता फिरावयास जाणारांनी. वाहनापासून सावध राहिले पाहिजे पांढर्या रंगाचे कपडे परिधान करूनच फिरावयास जावे.रस्त्यावर आपला हक्क आहे म्हणून ओव्हर करू नये.टू व्हीलर चालकांनी योग्य वेळी साइड दिली पाहिजेत.वाहनांचे हार्न अति कर्कश नसावेत .कारण नसतांना सतत हार्न वाजवू नयेत.योग्य अंतरावरूनच हाॅर्न वाजवावेत.फार जवळ जाऊन हाॅर्न वाढविल्यास पुढील वाहन चालक दचकून अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.माझी व समोरच्याची ही कोणीतरी घरी वाट पाहत आहे याचे भान असावे. वाहनांची योग्य वेळी काळजी घ्यावी.अशा बाबींचे पालन झाल्यास अपघाता सारखे अनर्थ टळू शकतात.
प्रा डाॅ.दिलीपकुमार कसबे
स.गा.म.काॅलेज, कराड
संपर्क:९४२०६२७३४५
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत